Benefits of Raw Milk : दूध हे आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचे फायदे होतात. रोज दूध प्यायल्याने शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होते. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. इतकेच नाही तर चेहऱ्यावर दूध लावल्यानेही अनेक फायदे होतात. म्हणजेच दूध तुम्हाला निरोगी आणि सुंदर बनवते. कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा अतिशय स्वच्छ आणि मुलायम राहते. हिवाळ्यात गालांना भेगा पडल्यास तुम्ही कच्चे दूध लावू शकता. याशिवाय कच्च्या दुधाचा वापर सुरकुत्या घालवण्यासाठीही केला जातो. काही लोकांना पिगमेंटेशनची समस्या असते, ही समस्या देखील कच्च्या दुधाने दूर केली जाऊ शकते. दुधात असे गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि डाग दूर करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने कोणते फायदे होतात?
कच्च्या दुधामुळे त्वचेला फायदा होतो
- कच्चे दूध त्वचेवर लावल्याने सुरकुत्यांची समस्या दूर होते आणि त्वचा खूप मऊ राहते.
- कच्च्या दुधामुळे त्वचेचा पोत एकसमान होतो आणि सनबर्नमध्ये फायदा होतो.
- कच्च्या दुधामध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटर असते जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.
- कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड असते ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा मुलायम आणि चमकते.
- जर तुम्हाला चेहऱ्यावर झटपट चमक हवी असेल तर कच्चे दूध लावून चेहऱ्यावर पाच मिनिटे राहू द्या आणि चेहरा धुवा.
- कच्चे दूध खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते.
- जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर त्यात कच्चे दूध लावल्यानेही फायदा होतो.
- रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहरा साफ होतो आणि यामुळे त्वचा मुलायम होते.
- कच्चे दूध त्वचेसाठी मॉईश्चरायझर म्हणून काम करते.
कच्चे दूध त्वचेवर कसे लावावे?
एका भांड्यात दोन चमचे कच्चे दूध घ्या. आता कापसाच्या साहाय्याने चेहरा, मान, हात आणि पाय या सर्व ठिकाणी लावा. दूध कोरडे होईपर्यंत त्वचेवर राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. अधिक चमक येण्यासाठी तुम्ही दुधात हळद देखील घालू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Paracetamol Uses : सावधान! 'या' पेयांसोबत पॅरासिटामोलची गोळी कधीही खाऊ नका, होईल वाईट परिणाम
- सलाम... सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या 2 वर्षीय चिमुरड्याच्या उपचारासाठी जमवले तब्बल 16 कोटी रुपये!
- Instagram Paid Subscriptions : इंस्टाग्राम आणणार नवं फिचर; रिल्स, व्हिडीओ बनवण्यासाठी सबस्क्रिप्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha