Election Result Update  : बिहार निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काही वेळात निकाल हाती येणार आहेत. सोबतच मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांचा निकाल देखील आज घोषित होत आहे. या निकालांचे कल हाती आले आहेत. बिहारमध्ये एनडीएनं आघाडी घेतली आहे तर मध्यप्रदेशातही भाजपनं मुसंडी मारलीय. या धामधुमीत निवडणूक आयोग आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय घोषणा करणार याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.


बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे.  नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन 112 जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए 122 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी 91, काँग्रेस 22 आणि लेफ्ट 11 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप 55, जेडीयू 49, हम दोन जागांवर आघाडीवर आहेत.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीला सर्वाधिक 80 जागा मिळाल्या होत्या. तर दुसऱ्या नंबरवर नितिशकुमार यांचा जेडीयू पक्ष होता. त्यांनी 71 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला 53, काँग्रेसला 27, एलजेपीला 2, आरएलएसपीला 2, हम पार्टीला 1 आणि 7 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या.  2015 मध्ये नितीश कुमार यांची जेडीयू, लालू प्रसाद यादवची आरजेडी आणि काँग्रेसने महागठबंधन बनवून बीजेपी, आरएलएसपी आणि एलजेपीच्या गठबंधन विरोधात विजय मिळवला होता.


ताज्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत मोरेना, सुमौली, दिमानी, अम्बाह, मेहगांव, गोहड, ब्यावरा आणि हाट पिपिलया विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. तर सुवासरा, सांवेर, बदनावर, नेपानगर, मांधाता, आगर, सांची, अनूपपुर, मल्हारा, सुरखी, मुंगौली, अशोक नगर बमूरी, ग्वालियर, ग्वालियर ईस्ट जागांवर भाजप आघाडीवर आहे.

MP, Gujarat, UP By Polls 2020 Results LIVE | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकांच्या 28 जागांपैकी 2 जागांवर भाजप आघाडीवर