नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणाच्या सुरुवातीला देशाच्या इतिहासात पहिल्यांदा रेल्वे अर्थ संकल्प आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प एकत्रित सादर केला जाणार असल्याचे सांगितलं. तसेच गेल्या वर्षी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अतिशय धाडसी असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. शिवाय 'सबका साथ, सबका विकास' हेच आपल्या सरकारचं लक्ष्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं


राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती देताना, सरकारने ईशान्य राज्यांच्या विकासासाठी सरकार विशेष भर देत असल्याचे सांगितलं. तसेच नोटाबंदीचा निर्णय अतिशय धाडसी असून, या निर्णयामुळे दहशतवादाचे फंडिंग आणि काळा पैशांवर चाप बसणार असल्याचं सांगितलं. यासाठी सरकारने सुरुवातीलाच एसआयटी स्थापन केल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केलं.

तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या असून, यासाठी भिम अॅप उपलब्ध करुन दिले. या माध्यमातून सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवाय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांमुळे त्यांना फायदा झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रपती म्हणाले की, ''सरकारने शेतकऱ्यांना मोफत 'माती परिक्षण कार्ड' (सॉईल हेल्थ कार्ड) पुरवलं. तसेच पीक विम्याचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाला. सरकारच्या धोरणांमुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळाल्याने डाळींच्या दरांमध्ये घट झाली,''असल्याचं नमूद केलं.

दहशतवादासंदर्भात बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, ''देशाला गेल्या चार दशकांपासून दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केलं.''

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील अन्य काही मुद्दे

  • 1.5 कोटी नागरिकांना मोफत गॅस कनेक्शन दिलं.

  • 'सबका साथ सबका विकास' लक्ष्य

  • गरिबांसाठी २६ कोटी बँक खाते

  • बँकिंग सिस्टिमशी सर्वसामान्यांना जोडलं

  • चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियान

  • शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले.

  • शेतकऱ्यांसाठी 'किसान सॉईल हेल्थ' कार्ड दिलं.

  • पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ झाला

  • खरीप हंगामात पिकांच्या उत्पन्नात 6 टक्क्यांनी वाढ

  • सरकारच्या योजनांमुळे डाळींच्या किमतीत घट

  • शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळाला

  • इंद्रधनुष्य योजनेतून ५५ लाख मुलांचे लसीकरण

  • वीज वाचवण्यासाठी ३ कोटी एलईडी बल्ब वाटप

  • ११ हजार गावांपर्यंत वीज पोहचवली

  • काळ्या पैशांविरोधातील लढ्यात सर्वांचे सहकार्य लक्षणीय

  • पहिल्यांदा वायूदलासाठी महिला वैमानिक मिळाली

  • प्रसूती रजा २६ आठवडे करण्यात आली

  • तरुणांसाठी कौशल्य विकासासाठी २४ हजार कोटी रुपये खर्च

  • सातावा वेतन आयोगाचा ५५ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल

  • रोजगार वाढीसाठी ६ हजार कोटी खर्च

  • देशभरात ३ कोटी शौचालय बांधले

  • आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरु

  • दिव्यांगांचे आरक्षण तीन टक्क्यावरुन चार टक्के केले

  • पॅरालिम्पिकमध्ये दिव्यांग खेळाडूंनी आपल्या प्रतिभेचे दर्शन जगाला घडवले

  • कौशल्य विकास कार्यक्रमामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली

  • सरकारच्या प्रत्येक योजनेत गरिबांचे कल्याण

  • ईशान्य भारताच्या विकासावर सरकारचा सर्वाधिक भर

  • ईशान्य भारतात रोड, रेल्वे मार्गांचे जाळे तयार करुन दळणवळण वाढवले

  • यावर्षीच्या अखेरपर्यंत मीटर गेज बदल्याच्या प्रमाणात वाढ होईल

  • ईशान्य राज्ये आपली अष्ठलक्ष्मी

  • ईशान्य भागात महामार्ग बनवण्याचे काम जलदगतीने सुरु आहे

  • रेल्वेच्या अधुनिकीकरणावरही भर

  • अरुणाचल मेघालयसाठी विशेष रेल्वे मार्ग विकसीत

  • गावांमधील मुलभूत सुविधा पोहचविण्यावर भर

  • चेन्नई आणि पुण्यासह चार शहारांमध्ये मेट्रो प्रकल्प उभारतंय

  • ८ नोव्हेंबर रोजीचा नोटाबंदीचा निर्णय धाडसी

  • काळा पैसा आणि दहशतवादाच्या फंडिंगवर लगाम बसला

  • काळ्या पैशांवर लगाम घालण्यासाठी सर्वात पहिला एसआयटी स्थापन केली

  • काळ्या पैशांचे सिंगापूर आणि मॉरेशिअस रुट बंद केले

  • सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करुन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं

  • चार दशकांपासूनची प्रलंबित मागणी 'वन रँक वन पेन्शन' योजनेला मूर्त रुप दिलं

  • डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मार्ग

  • भिम अॅपच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली

  • 34 लाख पदांसाठी मुलाखत प्रक्रिया संपवली

  • 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या योजनेवर काम सुरु आहे

  • केंद्र आणि राज्यातील निवडणुका एकत्र घेण्याचा विचार बोलून दाखवला

  • देशात परदेशी गुंतवणुकीत विक्रमी वाढ

  • गुंतवणुकीसाठी नियमात आवश्यक त्या सुधारणा केल्या

  • ईशान्य राज्यांमध्ये सुरक्षा आता पुर्वीपेक्षा चांगली

  • दहशतवादासमोर देश झुकणार नाही

  • चार दशकापासून देश दहशतवादाचा सामना करतोय

  • जम्मू-काश्मीरमध्ये प्रोयोजित दहशतवाद पसरवला जातोय

  • 2016 मध्ये पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढला