अर्थसंकल्पीय अधिवेशानदरम्यान खासदार ई अहमद यांना हार्ट अटॅक
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2017 12:31 PM (IST)
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांची प्रकृती बिघडली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना ई अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला. अहमद यांना तातडीने स्ट्रेचरवरुन राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ई अहमद यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पाड पाडली होती.