भोपाळ : गेल्या काही दिवसात देशभरात माणुसकीला लाजवणाऱ्या घटना समोर येत आहेत. पुराचा फटका बसलेल्या मध्य प्रदेशात एका गर्भवतीला बाळाला जन्म देण्यासाठी पावसाच्या पाण्यातून तब्बल 6 किलोमीटर पायपीट करत हॉस्पिटल गाठावं लागलं.

 

मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यात ही मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. संध्या यांच्या कुटुंबीयांनी सरकारी रुग्णालयात फोन करुन रुग्णवाहिका मागवली. मात्र ती पोहचण्यास अर्धा तास लागेल, असं उत्तर हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलं. आश्वासन दिलेल्या वेळेनंतरही 'जननी एक्स्प्रेस' या नावाने चालणारी सरकारी अॅम्ब्युलन्स न पोहचल्याने गर्भवतीच्या कुटुंबीयांनी रिक्षा बोलावली.

 
12 किलोमीटरच्या प्रवासात 6 किमीनंतर रिक्षा पुराच्या पाण्यात अडकली. त्यावेळी कुठलाच मार्ग नसल्यामुळे या पाण्यातून वाट काढत तब्बल 6 किलोमीटर पायपीट करुन  तिला प्रसुतिगृह गाठावं लागलं. रुग्णालयात पोहचताच तत्क्षणी त्यांची प्रसुती झाली.

 

 

https://twitter.com/ANI_news/status/769017246006009856

 

विशेष म्हणजे ही गावातली पहिलीच वेळ नसल्याचंही म्हटलं जात आहे. 'जननी एक्स्प्रेस' या नावाने चालणारी सरकारी योजना गरोदर महिलांना रुग्णालयात सुरक्षित नेण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र अनेकदा त्यांना बेडरोलमध्ये गुंडाळूनच नेलं जातं, असा दावा आशा केंद्रातील एका कर्मचाऱ्याने केला आहे.


संबंधित बातम्या :


 

बसमध्ये पत्नीचा मृत्यू, मृतदेहासह पतीला जंगलात उतरवलं


अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर, मुलीसह 10 किमी पायपीट