नवी दिल्लीः काश्मीरमधील हिंसाचारावरुन राजनाथ सिंहांनी दोन दिवसांचा दौरा केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. मुफ्ती आज काश्मीरमधल्या हिंसाचाराच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.

 

काश्मीर अशांत करणाऱ्यांचा मुफ्ती यांनी चांगलाच समाचार घेतला. 95 टक्के नागरिकांना शांतता हवी आहे तर केवळ 5 टक्के लोक काश्मीरमध्ये हिंसाचार घडवत असल्याचंही यावेळी मुफ्ती यांनी म्हटलंय. काश्मीर खोऱ्यात गेल्या 50 दिवसांपासून संचारबंदी सुरु आहे.

 

त्यामुळे हुर्रियत नेते आज सैनिकी छावण्य़ांसमोर विरोध प्रदर्शन करणार आहेत. दरम्यान काश्मीर खोऱ्यातील या हिंसाचारामुळे आत्तापर्यंत तब्बल 6 हजार 400 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

 

संबंधित बातमी

काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच देशवासीयांची इच्छा: राजनाथ