एक्स्प्लोर

प्रशांत किशोर यांचा सर्व्हे, राहुल गांधींपेक्षा मोदी खूप पुढे

या सर्व्हेचा निष्कर्ष राजकीय असला, तरी या सर्व्हेत महात्मा गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून देशाला विकासाच्या वाटेवर कोण नेऊ शकेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

नवी दिल्ली: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेचा निकाल जाहीर झाला आहे. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. या सर्व्हेचा निष्कर्ष राजकीय असला, तरी या सर्व्हेत महात्मा गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून देशाला विकासाच्या वाटेवर कोण नेऊ शकेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये 48 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दुसऱ्या नंबरवर असले, तरी दोघांमधील अंतर हे खूपच आहे. अवघ्या 11 टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या 18 सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करु शकतील. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून ही मोहीम सुरु केली. ज्यामध्ये सार्वजनिक सद्भावना, स्वच्छता, दारुबंदी, आरोग्य, शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. ‘नॅशनल अजेंडा फोरम’ असं या मोहिमेला नाव देण्यात आलं होतं. देशातील सुमारे 57 लाख नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. कोणता नेता ‘नॅशनल अजेंडा फोरम’ पुढे नेऊ शकतो? नरेंद्र मोदी- 48 टक्के राहुल गांधी -11.2 टक्के अरविंद केजरीवाल- 9.3 टक्के अखिलेश यादव -7 टक्के ममता बॅनर्जी - 4.2 टक्के मायावती-3.1 टक्के हा सर्व्हे कसा झाला? इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) चा सर्व्हे 57 लाख लोकांनी यामध्ये सहभाग घेतला 56 दिवसांच्या सर्वेक्षणानंतर निष्कर्ष 712 जिल्ह्यात सर्व्हे 923 नेत्यांना नामांकनं प्रशांत किशोर यांची कारकीर्द निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते. संबंधित बातम्या आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर कुणाला साथ देणार?  2019 च्या निवडणुकीत मोदी आणि प्रशांत किशोर पुन्हा एकत्र?  प्रशांत किशोर : नीतिशकुमारांना बाहुबली बनवणारा चाणक्य! 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
Embed widget