एक्स्प्लोर

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल : प्रशांत किशोर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच "पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा दावा रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे भाजपने निवडणुकीची आक्रमक तयारी केली असतानाच, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल." म्हणजेच भाजपला तिहेरी आकडा गाठता येणार नाही, असं ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे सहयोगी म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मीडियातील काही चॅनल्सनी भाजपचा गरजेपेक्षा जास्तच प्रचार केला आहे. पण सत्य हे आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठीच संघर्ष करावा लागेल. प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याने आपलं ट्वीट सेव्ह करण्याचं आवाहन करत म्हटलं की "जर भाजपची कामगिरी यापेक्षा चांगली झाली तर रणनीतीकाराचं काम सोडेन."

प्रशांत किशोर यांचं हे ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर आलं आहे. बंगाल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की, "विधानसभा निवडणुकीपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या राहतील."

प्रशांत किशोर यांच्यावर भाजपचा पलटवार दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या ट्वीटवर भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी आली आहे. सरकार बनल्यानंतर या देशाला एक निवडणूक रणनीतीकार गमवावं लागेल.

प्रशांत किशोर यांच्याविरोधात नाराजीचे सूर टीएमसीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी नाराजी दिसत आहे. हे नाराजीचे सूर प्रशांत किशोर यांच्याविरोधातील आहे. हावडाच्या शिवपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जटू लाहिडी यांनी पीके यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. लाहिडी यांनी थेट प्रशांत किशोर यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं आहे की ते आल्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे.

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्यासोबत करार केला आहे. प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत सक्रियरित्या काम करत आहेत. परंतु टीएमसीच्या अनेक जुन्या नेत्यांना प्रशांत किशोर यांची पद्धत पटत नाही. काही बंडखोर नेत्यांनी स्पष्टपणे प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
FSSAI Apps : 'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Embed widget