एक्स्प्लोर

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री?

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे रविवारी (17 मार्च) निधन झालं. वयाच्या 63 व्या वर्षी पणजीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पणजी : मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे प्रमोद सावंत विराजमान होण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघाचे आमदार असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेसाठी सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षातील आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकीत प्रमोद सावंत यांच्या नावावर चर्चा झाल्याचं समजतं. भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. पण महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने नेत्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र आज दुपारी सत्ताधारी भाजप आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करु शकतं. VIDEO | मनोहर पर्रिकरांना समर्थन होतं, भाजपला नाही : विजय सरदेसाई | गोवा | एबीपी माझा मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु झाला आहे. एकीकडे मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारीच गोव्यात दाखल झाले असून त्यांनी युती सरकारच्या आमदारांसोबत बैठक घेतली. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र आता गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. VIDEO | गोव्यात राजकीय हालचालींना वेग, दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया | एबीपी माझा मनोहर पर्रिकरांचं निधन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17) रात्री स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झालं. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशाने प्रामाणिक, मनमिळावू आणि सर्वार्थाने मोठा नेता गमावल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे आज दिल्लीसह इतर सर्व राज्यातील राजधानीमध्ये तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तर गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. संबंधित बातम्या मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता होणार अंत्यंसस्कार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा मनोहर पर्रिकरांनी सुचवलं 'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय   गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली

महत्त्वाच्या बातम्या

अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
Kamakhya Temple Viral Video: मुलगा अन् मुलगी सोबत एकत्र दिसले, गर्दीतील लोकांचा बाटलीनं हल्ला, गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात नको तो प्रकार, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मुलगा अन् मुलगी सोबत एकत्र दिसले, गर्दीतील लोकांचा बाटलीनं हल्ला, गुवाहाटीच्या कामाख्या मंदिर परिसरात नको तो प्रकार, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूरमध्ये मुसळधार, पावसाचे A टू Z अपडेट्स
राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूरमध्ये मुसळधार, पावसाचे A टू Z अपडेट्स
Donald Trump : इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर 4 ड्रोनद्वारे हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा जहाजावर ड्रोन हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
Uddhav Thackeray : दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते, कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही : उद्धव ठाकरे
कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा नागपूरमधून थेट इशारा
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Embed widget