एक्स्प्लोर

हिमाचलमध्ये पीपीई कीट घोटाळ्याप्रकरणी भाजप अध्यक्षांचा राजीनामा

कोरोनाच्या संकटात हिमाचल प्रदेशमध्ये पीपीई किट घोटाळा (PPE kit scam) झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव बिंदल (rajeev bindal) यांनी राजीनामा दिला आहे.

शिमला : कोरोनाच्या संकटात हिमाचल प्रदेशमध्ये पीपीई किट घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी राजीनामा दिला आहे. पीपीई किट घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळं नैतिक जबाबदारी घेत राजीनामा असल्याचं राजीव बिंदल यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात एक 43 सेकंदाची ऑडीओ क्लिप समोर आली होती. त्यात आरोग्य संचालक डॉ. अजयकुमार गुप्ता हे पीपीई पुरवठादाराकडे 5 लाख रुपयांची लाच मागत असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी गुप्ता अटकेत आहेत. यात बिंदल यांचाही सहभाग असल्याचा आणि भाजप अध्यक्ष बिंदल यांनी टेंडर दिलं असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळं आज बिंदल यांनी राजीनामा दिला. या क्लिपमध्ये करोडो रुपयांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपा नेत्यांची नावे घेतली जात होती. यामुळे राजीव बिंदल यांनी नड्डा यांना पाठविलेल्या राजीनाम्यामध्ये याचे कारण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित ऑडीओ क्लीप व्हायरल होत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश सरकारने त्याविरोधात कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात काही लोक भाजपाकडे बोट दाखवत आहेत. यामुळे मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करता यावी यासाठी नैतिकतेमुळे राजीनामा देत आहे, असे म्हटले आहे. बिंदल यांची साडेचार महिन्यांपूर्वीच भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. हिमाचल प्रदेश कांग्रेस अध्यक्ष कुलदीप सिंह राठौर आणि विधिमंडळ गटनेते मुकेश अग्निहोत्री यांनी कोरोना व्हायरसच्या या महामारीत हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागात झालेल्या या भ्रष्टाचाराच्या पापातून भाजप सुटू शकत नाही, असं म्हटलंय.  मुख्यमंत्री जयराम ठाकूर देखील या प्रकरणी जबाबदार आहेत. कारण आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
भारताला करावा लागणार उर्जा संकटाचा सामना? किती दिवसांचा साठा शिल्लक? अहवालातून महत्वाची माहिती समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला

Embed widget