एक्स्प्लोर

PPF आणि पोस्ट ऑफिस खात्यांना आधार लिंक करणं अनिवार्य

पोस्ट ऑफिसमधील खातेदारांना आपलं खातं आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

नवी दिल्ली :  सध्या प्रत्येक योजनेसाठी आधार बंधनकारक झालं आहे. त्यातच आता केंद्र सरकारने पीपीएफ, राष्ट्रीय बचत योजना पत्र आणि पोस्ट ऑफिसमध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी देखील आधार बंधनकारक केलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या पोस्ट ऑफिसमधील खात्यांना लवकरात लवकर आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं झालं आहे. अर्थमंत्रालयाने याबाबत अध्यादेश जारी केला असून, सध्या पोस्ट ऑफिसमधील खातेदारांना आपलं खातं आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच ज्यांना अद्याप आधार नंबर मिळालेला नाही, त्यांना आधार नंबरसाठी एखाद्या ओळख पत्रं सादर करावं लागणार आहे. पोस्ट ऑफिसमधील खात्याशी आधार कार्ड कसं लिंक करावं?
  • पोस्ट ऑफिसमधील खातं आधारशी लिंक करण्यासाठी खातेदारांना पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
  • सरकारने सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
  • बँक खात्यांप्रमाणे पोस्ट ऑफिस खातं आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करुन दिलेली नाही. कारण, देशातील बहुतांश पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईनची सुविधाच उपलब्ध नाही.
  • याशिवाय, केंद्र सरकारनं पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग स्किम (एनएससी) आणि किसान विकास पत्र (केवीपी) साठीही आधार नंबर बंधनकारक केला आहे.
पोस्ट ऑफिसचं जाळं सध्या देशभरात दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत. या कार्यालयांमधून पत्र पाठवणे, आणि घेण्यासोबतच पोस्ट ऑफिस खात्याचंही काम चालतं. देशाच्या ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे. लहान शहरं आणि ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्ये कॅश डिपॉझिटचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांवर याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने विविध स्किम आणि सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी, आधार नंबर मिळवण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली आहे. या पूर्वी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. आता 31 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड मिळवावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget