Coronavirus May Negatively Impact Semen Quality: कोरोना झालेल्या व्यक्तींच्या चिंतेत भर पाडणारी बातमी समोर आली. कारण, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे माणसाचे शुक्राणू कमकुवत (Post Covid Effects On Sperm Quality) होत असल्याचा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आयसीएमआर (ICMR)ने अपल्या अभ्यासात केला आहे. 


AIIMS च्या रिसर्चनुसार, ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्या शुक्राणूची संख्या कमी होत आहे. पाटना, दिल्ली आणि आंध्र येथील एम्सने याबाबतचा एक रिसर्च प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, कोरोना विषाणू शु्क्राणूच्या क्वालिटीवर परिणाम करतो. हा रिसर्च ऑक्टोबर 2020 आणि एप्रिल 2021 यादरम्यान एम्स पाटनामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 19 ते 43 वर्ष वयाच्या 30  रुग्णाच्या शुक्राणूवर अभ्यास केला. यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. याला स्पर्म काऊंटही म्हटले जाते. 


कोरोना रुग्णांच्या शुक्राणूची पहिली चाचणी संक्रमणानंतर लगेच केली होती. त्यानंतर दुसरी चाचणी अडीच महिन्याच्या अंतरानंतर करण्यात आली होती. शुक्राणूमध्ये कोरोना विषाणू आढळले नाहीत. पण, शुक्राणूची गुणवत्ता खालावल्याचं समोर आले. अडीच महिन्यानंतरच्या दुसऱ्या चाचणीत शुक्राणूची स्थिती फारशी चांगली नसल्याचं समोर आलं.  


शुक्रणूची गुणवत्ता कशी समजते?


वीर्य पातळ असतं, ज्यात शुक्राणू असतात. संभोगादरम्यान हे बाहेर देखील येतं. वीर्याची चाचणी करताना तीन प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. ज्यामध्ये शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंचा आकार, शुक्राणूंची गती यांचा समावेश होतो. याला 'स्पर्म मोटिलिटी' असेही म्हणतात. क्यूरियस जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. कोरोना रुग्णाच्या पहिल्या चाचणीमध्ये शु्क्राणूच्या नमुन्यातून असं समोर आलं आहे 30 पैकी 12 (40 टक्के) पुरुषांच्या शुक्राणूची संख्या कमी दिसली होती. अडीच महिन्यानंतर केलेल्या दुसऱ्या चाचणीत तीन (10 टक्के) पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या कमी झाली होती. पहिल्या शुक्राणूच्या नमुन्यात 30 सहभागी व्यक्तींपैकी 10 (33%) जणांमध्ये शुक्राणूची मात्रा (प्रति संभोग 1.5 ते 5 मिली यादरम्यान असावी) 1.5 मिली पेक्षा कमी दिसून आली. सीड्स ऑफ इनोसेंस आयव्हीएफ सेंटरच्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल म्हणाल्या की, 'कोविड-19 मुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. पुरुषांची प्रजनन क्षमता कमी झाल्याचे जगभरातील अभ्यासातून समोर आले आहे. 


कोरोनाचे सगळेच व्हेरिएंट किती घातक आहेत हे तर आपण सर्वांनीच अनुभवलंय..त्यामुळे कोरोना झाल्यानंतही हलगर्जीपणा करु नये. सकस आहार घ्यावा. रोज व्यायाम करावा. अल्कोहोल, सिगारेटपासून दूर राहावं. तणाव, चिंतेपासून दूर राहावं. डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा.आहार उत्तम ठेवल्यास कुठल्याही आजारापासून दूरही राहता येतं आणि झालेल्या आजारापासून शरीराला रिकव्हर करता येतं.