एक्स्प्लोर

Green Fungus : काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता हिरवी बुरशी; 'या' राज्यात आढळला पहिला रुग्ण

कोरोनानंतर काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या बुरशीचे प्रकार रुग्णांमध्ये आढळले आहेत. पण आता इंदूरमध्ये देशातील पहिला हिरव्या बुरशीची बाधा झालेला रुग्ण आढळला आहे.

इंदूर : मध्य प्रदेशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या इंदूर शहरात पोस्ट कोविड रुग्णांची वाढही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. इंदूरच्या शासकीय व खासगी रुग्णालयात काळ्या बुरशीचे 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आता इंदूरमध्ये हिरव्या बुरशीच्या (Green Fungus) रुग्णाचे निदान झाले आहे. देशातील ही पहिली घटना आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. ही रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होत आहे. मात्र आता इंदूरमध्ये नव्या हिरव्या बुरशीजन्य संसर्गाने चिंता वाढली आहे. कोरोनानंतर काळ्या, पांढर्‍या आणि पिवळ्या बुरशीचे प्रकार आढळले आहेत. पण आता इंदूरमध्ये देशातील अशी पहिली घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 90 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला हिरव्या बुरशीची बाधा झाली आहे.

फुफ्फुसात हिरव्या बुरशीचे निदान

आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अपूर्व तिवारी यांनी सांगितलं की , वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला इंदूरच्या अरबिंदो रुग्णालयाकडून अहवाल मिळाला आहे. ज्यात तज्ज्ञ डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, 34 वर्षीय विशाल श्रीधर हे दीड महिन्यापासून अरबिंदो रुग्णालयात उपचार घेत होते.  परंतु त्यांचे 90 टक्के फुफ्फुस निकामे झाले होते. त्याच्यावर सर्व शक्य उपचार केले जात होते. जेव्हा त्याच्या फुफ्फुसांची तपासणी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये केली गेली तेव्हा असे आढळले की रुग्णाच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आहे. ज्याला म्युकर म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. 

हिरव्या रंगामुळे या बुरशीला ग्रीन फंगस असे नाव देण्यात आले आहे. डॉ अपूर्व म्हणाले की, देशातील ही पहिली घटना आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसात हिरवी बुरशी आढळली आहे. विशाल श्रीधर नावाच्या रुग्णाला खासगी चार्टर्ड प्लेनमधून मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेफर केले गेले आहे. डॉ. रवी दोशी मुंबईच्या डॉक्टरांशी सतत संपर्कात राहून रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे, रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या अरबिंदो रुग्णालयाचे डॉ. रवी दोशी यांनी सांगितले की, हिरवी बुरशी रुग्णाच्या सायनसमध्ये फुफ्फुसात रक्तामध्ये आढळली आहे. कोविडचा रुग्ण असल्याने त्याच्या फुफ्फुसाचे आधीच नुकसान झाले होते. 

डॉ.  रवी दोशी पुढे म्हणाले की, एस्परगिलसच्या लक्षणांबद्दल बोलायचे तर नाकातून रक्तस्त्राव होणे, नाक बंद होणे, सर्दी, डोकेदुखी आणि ताप यासारखी अनेक लक्षणे आढळतात. कोरोना उपचारादरम्यानची ही पहिली घटना ज्यामध्ये अशी लक्षणे समोर आली आहेत. हे कोरोना आणि म्यूकरमाकोसिस एवढेच घातक आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले होते की कोणत्याही रंगाच्या नावाने बुरशीला ओळखले जाऊ नये. 

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Embed widget