Police Commemoration Day 2022 : देशभक्तीच्या भावनेसाठी बहुतेक भारतीय सैनिकांचे स्मरण केले जाते. पण देशातील पोलिसांसाठी खास दिवस लोकांना फारसा आठवत नाही. हा दिवस म्हणजे 'पोलीस स्मृती दिन' (Police Commemoration Day 2022). या दिनाला 'पोलीस शहीद दिन' असे देखील म्हणतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाची सेवा करताना शहीद झालेल्या देशातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मात्र, 21 ऑक्टोबरला पोलिस स्मृती दिन साजरा करण्यामागे 1959 ची घटना आहे जी चीनशी संबंधित आहे.   


देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच पोलिसांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.


पोलीस स्मृती दिन का साजरा करतात? (Police Commemoration Day 2022 Importance) :


21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख (Ladakh) येथे चीनच्या (China) सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्या दिवसापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.


काय घडलं होतं त्या दिवशी?


त्यावर्षी 21 ऑक्टोबर 1959 रोजी भारत-चीन सीमेचे रक्षण करणार्‍या दहा पोलीस जवानांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या घटनेला त्याच वर्षी 20 ऑक्टोबरला सुरुवात झाली. त्यावेळी भारत आणि तिबेटमधील अडीच हजार मैल लांबीची सीमा राखण्याची जबाबदारी भारतीय राखीव पोलीस दलातील पोलिसांच्या हाती होती. ईशान्य लडाखमध्ये तिबेटच्या सीमेवर ही घटना घडली, मात्र या प्रकरणात चीनचा हात होता. तोपर्यंत तिबेट चीनचा भाग बनला होता. सीआरपीएफच्या तिसर्‍या बटालियनच्या कंपनीच्या तीन तुकड्या ईशान्य लडाखच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी हॉट स्प्रिंगच्या ठिकाणी वेगळ्या गस्तीवर पाठवण्यात आल्या होत्या. गस्तीवर गेलेल्या तीन पैकी दोन तुकड्या दुपारी वेळेवर परत आल्या, पण तिसरी तुकडी, ज्यात दोन पोलीस हवालदार आणि एक पोर्टर होता, आला नाही. दुसऱ्या दिवशी या तुकडीचा शोध घेण्यासाठी नवीन तुकडी तयार करण्यात आली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सैनिक जखमी होऊ लागले आणि 10 पोलीस शहीद झाले. त्यानंतर 1959 मध्ये झालेल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेत या घटनेत शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि देशासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.






महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन : 


पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे. "हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही". अशा शब्दांत महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) अभिवादन केलं आहे.


महत्वाच्या बातम्या : 


PM Modi In Kedarnath: दौरा केदारनाथचा, पण लक्ष हिमाचलवर! पंतप्रधान मोदींच्या पेहरावाने चर्चांना उधाण