Petrol Diesel Price in 21 October 2022 : गेल्या 24 तासांत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत फारसा चढ-उतार झालेला नाही. तसेच, देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol Diesel Price) जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

केंद्र सरकारनं यापूर्वी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तेव्हापासून देशातील मेघालय आणि महाराष्ट्र ही दोन राज्य वगळता इतर राज्यांमध्ये दर स्थिर आहेत. 

कच्च्या तेलाचे दर काय?

कच्च्या तेलाच्या दरांबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत यात कोणताही विशेष बदल झालेला नाही. या दरम्यान, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 0.18 डॉलरने वाढून 92.29 डॉलरवर पोहोचली आहे, तर WTI  0.10 डॉलरने वाढून 85.98 डॉलर प्रति बॅरल आहे.

देशातील महानगरांतील किमती काय? 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये

92.76 रुपये

राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).