एक्स्प्लोर

ना कायदा, ना कोर्ट, संशय आला की यूपी पोलीस थेट डोक्यात गोळी घालतात

जवळून गोळी मारल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पोलिसांनी संशयित समजून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. या तरुणाच्या डोक्यात गोळी लागूनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. जवळून गोळी मारल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यूपीची राजधानी लखनौमधील गोमती नगर परिसरात पोलिसांनी संशयित समजून एका युवकावरच गोळी झाडल्याचं समोर आलं आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आता हत्येचा गुन्हा दाखल केला जात असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. यूपी पोलिसांची पत्रकार परिषद ज्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा या गोळीबारामध्ये समावेश होता, त्यांच्यावर भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांना अटकही करण्यात आली आहे. ही परिस्थिती टाळली जाऊ शकत होती. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती यूपी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. पोलिसांचं म्हणणं काय? या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री बारा वाजता मृत्यू झाला. “कार चालवणारा हा तरुण संशयित वाटत होता, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर कार चढवण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर गोळी घातली,” असा दावा पोलिसांनी केला आहे. “गोमतीनगर परिसरात एक कार उभी असताना समोरुन दोन पोलीस कर्मचारी येत होते. पोलिसांना पाहताच ही कार निघून जात होती. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच गोळी चालल्याचा आवाज आला. अचानक गाडी एका खांबावर आदळली. विवेक त्यानंतर रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू गोळी लागल्याने झाला की गाडी खांबावर आदळल्याने याचा तपास सुरु आहे,” अशी माहिती लखनौचे एसएसपी कलानिधी नैथानी यांनी दिली. शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट झालं आहे, की विवेकचा मृत्यू हा गोळी लागल्यानेच झाला. कोण आहे मृत तरुण? सुलतानपूर इथे राहणारा विवेक हा तरुण अॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर या पदावर काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. याचदरम्यान विवेकची सहकारी सना हिला मीडियाशी बोलू नये यासाठी पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. प्रत्यक्षदर्शी नजरकैदेत पोलीस कर्मचाऱ्याने गोळी मारल्याची घटनेची विवेकची महिला सहकारी ही प्रत्यक्षदर्शी आहे. तिला पोलिसांनी गोमतीनगरमधील तिच्या घरीच नजरकैदेत ठेवलं आहे, जेणेकरुन तिला मीडियाशी बोलता येणार नाही. गोळीबाराची घटना घडली तेव्हा ती विवेकसोबत कारमध्ये होती. पत्नीचा सवाल विवेकच्या पत्नीने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ''विवेकला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं की सोबत असलेल्या महिला सहकाऱ्याला तिच्या घरी सोडून येणार आहे. काही वेळाने फोन केला तर दुसऱ्या एका व्यक्तीने फोन उचलला आणि सांगितलं की अपघात झालाय. रुग्णालयात गेल्यानंतर खरं काय ते सांगितलं नाही. असं सांगण्यात आलं, की डोक्याला मार लागल्यामुळे जास्त रक्तस्राव झाला आणि त्यांना वाचवता आलं नाही,'' अशी माहिती विवेकची पत्नी कल्पनाने दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कल्पना यांनी काही सवाल केले आहेत. “मला योगी आदित्यनाथ यांच्याकडून उत्तर हवंय की पोलिसांनी माझ्या नवऱ्याला का मारलं? ते कोणत्याही परिस्थितीत असतील तरी गोळी का मारली? आरटीओकडून नंबर घेऊन नंतर पत्त्यावर येऊ शकले नसते का? गोळी मारण्याची काय गरज होती,” असा सवाल कल्पना यांनी केला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः घटनास्थळावर येणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार केला जाणार नाही. हा दिवस पाहण्यासाठी आम्ही त्यांना मतदान केलं नव्हतं, असं म्हणत विवेकच्या मेहुण्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालकांशी या प्रकरणी फोनवरुन बातचीत केली आहे. तर उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vantara : जन्मतःच पाय फ्रॅक्चर झालेल्या सात आठवड्यांच्या 'राजा' हत्तीच्या पिल्लाला जीवदान, आसाममधून थेट गुजरातमधील 'वनतारा'मध्ये एअरलिफ्ट
जन्मतःच पाय फ्रॅक्चर झालेल्या सात आठवड्यांच्या 'राजा' हत्तीच्या पिल्लाला जीवदान, आसाममधून थेट गुजरातमधील 'वनतारा'मध्ये एअरलिफ्ट
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Rahul Gandhi: राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं; डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन अन् शी जिनपिंग यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत म्हणाले, 'तडजोड केलेला पंतप्रधान कधीही..'
राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं; डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन अन् शी जिनपिंग यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत म्हणाले, 'तडजोड केलेला पंतप्रधान कधीही..'

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Embed widget