लखनौ : भारतीय जनता पक्षाच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. साधना सिंह यांनी मायावतींची तुलना तृतीयपंथीयांशी केली आहे. त्यानंतर साधना सिंह यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

साधना सिंह यांनी मायावतींची तृतीयपंथीयांशी तुलना केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरु झाली. या टीकेनंतर सिंह यांनी माफीनामा सादर केला आहे. यामध्ये सिंह यांनी म्हटले आहे की, 'मी केलेल्या भाषणात मला कोणालाही दुखवायचे नव्हते. माझ्या भाषणातून जर कुणाला वाईट वाटले असेल अथवा दुःख झाले असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते."

सिंह यांच्या बेताल वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावरुन साधना सिंह यांना बहुजन समाज पार्टीने नोटीस बजावली आहे. याबरोबरच महिला आयोगानेही या वक्तव्याची दखल घेऊन साधना सिंह यांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले आहेत.

बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. भाजपा नेत्यांनी मायावतींविरोधात केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची वैचारिक पातळी समजते."

पाहा काय म्हणाल्या होत्या साधना सिंह 


साधना सिंह यांचा माफीनामा