एक्स्प्लोर

या सर्व घोटाळ्यांमध्ये बँकेतील तुमचा पैसा किती सुरक्षित आहे?

बँकेत असलेला तुमचा-आमचा पैसा किती सुरक्षित आहे, असा प्रश्न या सतत समोर येणाऱ्या घोटाळ्यानंतर पडणं स्वाभाविक आहे.

मुंबई : बँकेत असलेला तुमचा-आमचा पैसा किती सुरक्षित आहे, असा प्रश्न या सतत समोर येणाऱ्या घोटाळ्यानंतर पडणं स्वाभाविक आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यानंतरही खातेधारकांचा पैसा सुरक्षित आहे, याची हमी बँक देते का, असाही प्रश्न उपस्थित होतो. मात्र बँक सोडाच, पण सरकार एक असं विधेयक आणत आहे ज्यामुळे बँक आपली परिस्थिती सुधारण्यासाठी तुमचा पैसा पाहिजे तसा वापरु शकते. फायनन्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शोरन्स बिल (एफआरडीआय) असं या विधेयकाचं नाव आहे. या नव्या विधेयकातील एका तरतुदीमुळे सरकारी बँकांना हा अधिकार मिळू शकतो, की बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर जमाकर्त्यांना किती पैसा परत करावा. म्हणजेच बँक बुडीत निघाली तर जमाकर्त्याचे सर्व पैसेही जाऊ शकतात. सध्याच्या नियमानुसार, बँकेत तुमचे 10 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा असतील आणि बँक बुडीत निघाली तर केवळ 1 लाख रुपये परत मिळतात. दरम्यान, हे विधेयक अद्याप खासदारांच्या संयुक्त समितीकडे विचाराधीन आहे. एक लाख रुपयांची कमाल मर्यादा वाढवण्यास तयार असल्याचं सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत सांगितलं. मात्र ही मर्यादा वाढवण्यासाठी उर्जित पटेल तयार नाहीत. कमाल मर्यादा वाढवली तर बँकांवरील भार वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे. 1993 साली एक लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. आरबीआय नव्या विधेयकासाठी तयार असल्याचं एफआरडीआय या विधेयकासाठी नेमण्यात आलेल्या समितीने म्हटलं आहे. मात्र एक लाख रुपयांची मर्यादा वाढवण्यास आरबीआयचा विरोध आहे. सरकारी बँकांमधील एनपीए म्हणजे बुडीत कर्ज सध्या सहा लाख कोटींच्याही पुढे गेलं आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडील बुडीत कर्जाची आकडेवारी जून महिन्यात 88 हजार कोटी एवढी होती.

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget