अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झाला. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर ट्रेन चढली, ज्यामध्ये 50 जण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. पण तब्बल 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच रेल्वेमंत्री पियुष गोयल, गृहमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शोक व्यक्त केला आहे
50 पेक्षा जास्त जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. पोलिसांकडून आणखी चौकशी केली जात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्याचंही ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1053302267884027904
राष्ट्रपतींचंही ट्वीट
दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला. अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन काम करत आहे. मृतांना श्रद्धांजली वाहतानाच त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वनही केलं आहे.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1053301399218458625
अमित शाहांकडूनही श्रद्धांजली
भाजप अध्यक्ष अमित शाहांनी अमृतसर रेल्वे दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना बचावकार्यात मदत करण्यास सांगितल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शाहांनी ट्वीट करुन मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
https://twitter.com/AmitShah/status/1053304726060699649
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमृतसर रेल्वे दुर्घटना : पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Oct 2018 09:17 PM (IST)
पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच रेल्वेमंत्री पियुष गोयल, गृहमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शोक व्यक्त केला आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -