मेरठच्या काशी गावातील सन्नवरचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गुरुवारी संध्याकाळी मैत्रीण बनून तो या तरुणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. त्याने बुरखा परिधान केला होता. मुलगी समजून कुटुंबीयांनी त्याला घरात प्रवेश दिला आणि मग तो तरुणीच्या खोलीत पोहोचला. खोलीत दोघांची चर्चा सुरु असताना एक महिला पाणी देण्यासाठी आत आली. मात्र तरुणीच्या मैत्रिणीला पाहून महिलेला धक्का बसला.
तरुणीची मैत्रीण मुलगी नसून मुलगा आहे आणि त्यांच्या प्रेमसंबंध असल्याचं कुटुंबीयांना समजलं. त्याने कुर्ती सलवारवर बुरखा परिधान केला होता. मुलींप्रमाणे चेहऱ्यावर मेकअपही केला होता. इतकंच नाही तर त्याने नकली केसही लावले होते. मुलीच्या वेषात मुलाला पाहून महिला जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय खोलीत आले.
मग काय, सगळ्यांनी मिळून त्याला बेदम चोप देण्यास सुरुवात केली. आधी कुटुंबीय आणि मग गोंधळ झाल्याने मोहल्ल्यातील लोक जमा झाले. त्यांनी रस्त्यावर या मजनूला पळवून पळवून मारलं. यावेळी सन्नवरने आपल्यासोबत आणलेल्या बेशुद्धीच्या गोळ्या खाल्ल्या. मार आणि गोळ्यांच्या परिणाम झाल्याने तो काही वेळातच बेशुद्ध झाला. मग गावकऱ्यांनी त्याला पोलिसांना सोपवलं.
सन्नवरने 15 दिवसांपूर्वी या घरातील मुलीला पळवून नेलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हाही दाखल केला होता. मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यातही घेतलं. सन्नवर या प्रकरणात आरोपी होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. तो गावातच असल्याची कुणकुणही पोलिसांनी लागली नव्हती. शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाताला लागला नव्हता.
मात्र सन्नवरला त्याच्या प्रेयसीला भेटायचं होतं. त्यासाठी त्याने फिल्मी स्टाईलचा आधार घेतला. मुलींचा वेष करण्यासोबतच दाढी करुन चेहऱ्यावर मुलींप्रमाणे मेकअपही केला होता. सन्नवर विवाहित असून त्याला चार अपत्य असल्याचं कळतं.
परतापूर पोलीस स्टेशनचे इनचार्ज नीरज मलिक यांच्या माहितीनुसार, घरात सन्नवरची ओळख पटल्यानंतर त्याने आपल्याकडील चाकूने कुटुंबीयांवर हल्ला केला. यानंतर त्याला पकडण्यासाठी कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली. आरोपीला चाकूसह अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.