एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात
अक्षरधाम हे आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरेचं प्रतीक असल्याचे गौरवोद्वार यावेळी मोदींनी काढले.
![पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात PM Narendra Modi visits akshardham temple in Gujrat latest update पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/02214507/Akshardham-Mandir-Gujrat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अक्षरधाम मंदिराला भेट दिली. या मंदिराचा रौप्य महोत्सवी सोहळा सुरु आहे.
अक्षरधाम हे आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरेचं प्रतीक असल्याचे गौरवोद्वार यावेळी मोदींनी काढले. गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर 1992 साली उभारण्यात आलं.
निवडणुकीच्या काळात अक्षरधाम मंदिराला भेट देणं महत्वपूर्ण मानलं जातं. पाटीदार समाजाची अक्षरधाम मंदिरावर श्रध्दा आहे. गुजरातमध्ये 15 टक्के पाटीदार समाज आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत या समाजानं भाजपला साथ दिली, मात्र हार्दिक पटेलनं आरक्षणाचा मुद्दा उठवल्यानंतर पाटीदार भाजपवर नाराज आहेत.
डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 18 डिसेंबरला निकाल असून गुजरात राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)