Pakistan Conspiracy : जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या सामर्थ्याने पाकिस्तानची चांगलीच झोप उडाली आहे. भारताची बदनामी करण्याच्या उद्धेशाने पाकिस्तानकडून भारताविरुद्ध नवीन हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचे सोशल मीडियाच्या एका अहवालातून समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यूएई दौऱ्यावर असताना तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हे पाहून पाकिस्तानचा चांगलाच त्रागा झालाय. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताची अशा पद्धतीने बदनामी करण्यात येत आहे.  


पाकिस्तानकडून सोशल मीडियावर ट्रेंड
पाकिस्तानमध्ये भारताविरोधात सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड चालवला जात आहे. यासाठी पाकिस्तानकडून हजारो ट्विट करण्यात आले आहेत. #prophetmuhammad, #boycottindia, #Modi, #Arab आणि #nupursharma हे हॅशटॅग पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाले आहेत. 


पाकिस्तानकडून हजारो पोस्ट केल्यानंतर या पोस्टखाली जगभरातील अनेक देशांमधून एक लाखाहून अधिक कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध भाषांमधून करण्यात आलेल्या या लाखो कमेंट्स या अनेक देशांमधून करण्यात आलेल्या नाहीत तर त्या फेक लोकेशनवरू करण्यात आल्या आहेत. या कमेंट्स करण्यासाठी पाकिस्तानकडून जवळपास 46 हजार फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारताचे खाडी देशांसोबचे संबंध बिघडवण्यासाठी पाकिस्तानकडून भाजपच्या माजी प्रवक्त नुपूर शर्मा यांच्या संबंधीत  हॅशटॅग ट्रेंड केले जात आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्यव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या नावाच वापर करून पाकिस्तानकडून ट्रेंड चालवले जात आहेत.   
 
पाकिस्तानकडून  #StopInsulting_ProphetMuhammad आणि #Nupursharama ट्रेंड सोशल मीडियावर चालवले जात आहेत. या पोस्ट करण्यासाठी लाखो फॉलोअर्स असलेल्या ट्विटर हँडलचा वापर करण्यात येत आहे. या हॅशटॅगवर आतापर्यंत हजारो पोस्ट करण्यात आल्या असून अजूनही हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चावला जात आहे. भारताची बदनामी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानकडून हा ट्रेंड चालवला जात आहे. या हॅशटॅगवर फक्त पाकिस्तानातून जवळपास 20 हजार ट्विट करण्यात आली आहेत. नुपूर शर्मा, पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विरोधात या पोस्टमधून लिहिण्यात आले आहे.  


पाकिस्तानच्या या नापाक कृत्यामुळे कतार, इराण, कुवेत आणि सौदी अरेबिया या देशांनी नुपूर शर्माच्या  वादग्रस्त वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. या देशांच्या नाराजीमुळे भारताला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.