PM Narendra Modi to visit UP on 3rd June : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्हणजेच 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ येथे पोहोचतील. तिथे ते उत्तरप्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या तिसऱ्या (3.0) पायाभरणी सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 1:45 च्या सुमाराला , पंतप्रधान कानपूरच्या पारौंख गावात पोहोचतील, तिथे ते माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पाथरी माता मंदिराला भेट देतील.त्यानंतर, दुपारी 2 च्या सुमाराला , ते डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला भेट देतील, त्यानंतर 2:15 वाजता मिलन केंद्राला भेट देतील. हे केंद्र माननीय राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे, जे सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आणि त्याचे रूपांतर समुदाय केंद्र (मिलन केंद्र) मध्ये करण्यात आले. त्यानंतर ते दुपारी 2:30 वाजता पारौंख गावात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
पायाभरणी समारंभा दरम्यान, पंतप्रधान 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या 1406 प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये कृषी आणि संलग्न, माहिती आणि तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, औषोधोत्पादन , पर्यटन, संरक्षण आणि अवकाश , हातमाग आणि वस्त्रोद्योग इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या समारंभाला देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
29 जुलै 2018 रोजी पहिला पायाभरणी समारंभ आणि 28 जुलै 2019 रोजी झालेला दुसऱ्या पायाभरणी समारंभासह उत्तरप्रदेश गुंतवणूकदार परिषद 2018 ही 21 ते 22 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.पहिल्या पायाभरणी सोहळ्यादरम्यान, 61,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या 81 प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली, तर दुसऱ्या पायाभरणी सोहळ्यात, 67,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या 290 प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Minister Jayant Patil : नाशिक जिल्ह्यातील किकवी, गोदावरी पेयजल प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, मंत्री जयंत पाटील यांची माहिती
- Nashik News : नाशिकमध्ये फिरते पशुवैद्यकीय युनिट जनावरांना ठरतेय वरदान, अशी आहे हेल्पलाईन
- Nashik Godawari : गोदामाईत आढळले गटार मिश्रित पाणी, मनपा आयुक्त रमेश पवार स्वतः उतरले नदी पात्रात