एक्स्प्लोर

PM Modi : पंतप्रधान मोदी बुधवारी हरियाणा आणि पंजाब दौऱ्यावर, आरोग्य उपक्रमांचे करणार उद्घाटन

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑगस्ट 2022 रोजी हरियाणा आणि पंजाबचा दौरा करणार आहेत.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑगस्ट 2022 रोजी हरियाणा आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे अमृता रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोहालीला जातील आणि दुपारी 02:15 वाजता मुल्लानपूर, न्यू चंदीगड, साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) येथे ‘होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र’ राष्ट्राला समर्पित करतील.

पंतप्रधानांची हरियाणा भेट -
पंतप्रधानांद्वारे फरिदाबादमध्ये अमृता रुग्णालयाचे उदघाटन झाल्यावर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेला चालना मिळेल. माता अमृतानंदमयी मठाचे व्यवस्थापन असणारे सुपर स्पेशालिटी रुग्णालय 2600 खाटांनी सुसज्ज असेल. सुमारे 6000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे रुग्णालय, फरिदाबाद आणि संपूर्ण एनसीआर मधील लोकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्रदान करेल.

पंतप्रधानांची पंजाब भेट - 
पंजाब आणि शेजारील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील रहिवाशांना जागतिक दर्जाची कर्करोग सेवा पुरविण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान मुल्लानपूर, न्यू चंदीगड, साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) येथे 'होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र' राष्ट्राला समर्पित करतील. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत टाटा मेमोरियल सेंटर या अनुदानित संस्थेद्वारे 660 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हे रुग्णालय बांधण्यात आले आहे. कर्करोग रुग्णालय हे 300 खाटांच्या क्षमतेचे टर्शरी केअर रुग्णालय आहे आणि शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजी – केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण यासारख्या उपलब्ध उपचार पद्धतींचा वापर करून सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. हे रुग्णालय संपूर्ण क्षेत्रात कर्करोग सुविधा आणि उपचारांसाठी "केंद्र" म्हणून काम करेल आणि संगरूरमधील 100 खाटांचे रुग्णालय त्याची "शाखा" म्हणून काम करेल.

श्रममंत्र्यांच्या राष्ट्रीय कामगार परिषदेत करणार मार्गदर्शन 
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेचार वाजता, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील  श्रम मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आंध्रप्रदेशात तिरूपती येथे, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी, ही परिषद आयोजित केली आहे. भारतातील सहकार्यात्मक संघराज्य भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत, श्रम आणि कामगारांसंबंधीच्या विविध मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक चांगली धोरणे आखली जावीत, तसेच, कामगारांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढवण्यासही या परिषदेमुळे मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Embed widget