एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान, मुख्यमंत्रीही चेन्नईला जाणार
नवी दिल्ली : जयललिता यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चेन्नईला जाणार आहेत.
नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना संसद भवनात अभिवादन करुन, चेन्नईला रवाना होतील.
जयललिता यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता चेन्नईतील मरिना बीचवर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, मोदींशिवाय सरकारतर्फे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू आणि पी.राधाकृष्णन हे दोन मंत्री जयललितांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही यावेळी उपस्थित असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement