एक्स्प्लोर
Advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान आज संध्याकाळी 5 ते 6 च्या सुमारास देशाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान काळ्या पैशांविरोधातील लढाई आणि नोटाबंदीसंबंधित काही मोठ्या घोषणा करु शकतात.
एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ!
नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली. नोटाबंदीबाबत त्यांनी 50 दिवसांची मुदत मागितली होती. परंतु 50 दिवस उलटल्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे नोटाबंदीची डेडलाईन संपल्याने मोदी आज काय बोलणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान देशाला संबोधित करण्याआधी पंतप्रधान सरकारमधील काही मंत्र्यांची बैठकही घेणार आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही करणार आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
Advertisement