एक्स्प्लोर

नक्षलवादाबाबत काँग्रेसची दुतोंडी भूमिका, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

एकीकडे शहरी नक्षलवादाचं समर्थन करायचं आणि दुसरीकडे छत्तीसगडच्या नक्षली भागात आल्यावर नक्षलवादावर कारवाई करण्याच्या बाता करायच्या. ही काँग्रेसची दुतोंडी भूमिका असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

बस्तर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरममध्ये प्रचार सभा तापत आहेत. आज छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नक्षलवादाबाबत काँग्रेसनं नेहमीच दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप मोदींनी केला आहे. एकीकडे शहरी नक्षलवादाचं समर्थन करायचं आणि दुसरीकडे छत्तीसगडच्या नक्षली भागात आल्यावर नक्षलवादावर कारवाई करण्याच्या बाता करायच्या. ही काँग्रेसची दुतोंडी भूमिका असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलींनाही काँग्रेस क्रांतीकारी ठरवतंय हे दुर्दैवी आहे, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागात प्रचार सभेत पंतप्रधान  मोदी यांनी पहिल्यांदाच थेट शहरी नक्षलवादावर भाष्य केले आहे. शहरी नक्षलवादी हे एसी खोलीत बसतात, त्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतात. पण ते रिमोट कंट्रोलद्वारे आदिवासी भागातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत आणि अशा शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस का पाठिंबा देत आहे, पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, अशा शब्दात  मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपा हा कोण्याच्या कृपादृष्टीवर चालणारा पक्ष नाही, देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजपासाठी हायकमांड आहे, असेही ते म्हणाले. मोदी म्हणाले की, ज्या मुलांच्या हातात पेन- पेन्सिल असायला हवी अशा मुलांच्या हातात काही राक्षसी वृत्तीचे लोक शस्त्रं देतात. त्यांच्या आई- वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त करतात. जे शहरी नक्षलवादी आहेत, त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, स्वत:देखील चांगले आयुष्य जगतात, एसी खोलीत बसतात. पण रिमोट कंट्रोलद्वारे ते आदिवासी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. दूरदर्शनचा पत्रकार कॅमेरा घेऊन आला होता. या पत्रकाराची नक्षलींनी हत्या केली, अशा नक्षलींना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, ही कोणती विचारधारा आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget