एक्स्प्लोर

जग एक विश्वासार्ह भागीदार शोधतंय, भारताकडे ती क्षमता, सामर्थ्य : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) 95व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित केलं.जग एक विश्वासार्ह भागीदार शोधत आहे आणि भारताकडे क्षमता, सामर्थ्य आणि कार्यक्षमता आहे, असं मोदींनी म्हटलंय.

नवी दिल्ली : आज देशाला आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे. स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जग एक विश्वासार्ह भागीदार शोधत आहे आणि भारताकडे क्षमता, सामर्थ्य आणि कार्यक्षमता आहे. भारतीय उद्योगांनी भारताविषयी जगात जो विश्वास वाढला आहे त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलं. मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) च्या सत्राला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 95 वर्ष निरंतर देशाची सेवा करणं कोणत्याही संस्थेसाठी मोठी गोष्ट असते. आयसीसीनें पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भागाच्या विकासासाठी दिलेलं योगदान मोठं आणि ऐतिहासिक आहे, असं मोदी म्हणाले. कधी-कधी वेळ आपली परीक्षा घेते. अनेकदा कठीण परिस्थिती आणि अशा परीक्षा एकसाथ येतात. मात्र अशा कसोटीच्या काळात आपलं कृतित्व उज्ज्वल भविष्याबाबत गॅरंटी देखील देऊन जातं, असं मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत, स्व विश्वसनीय भारत आपल्याला करायचा आहे. आत्मनिर्भरतेचा हा भाव प्रत्येक भारतीयाने कित्येक वर्षांपासून एक आकांक्षा म्हणून जगला आहे. मात्र ते राहूनच गेलं होतं. मागील 5-6 वर्षात देशातील धोरणांमध्ये भारताला आत्मनिर्भर करणे हेच लक्ष्य मुख्य राहिले आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत, असं देखील ते म्हणाले. ते म्हणाले की, आता लोकल प्रोडक्ट्ससाठी क्लस्टर बेस्ड अॅप्रोचला भारतात प्रोत्साहन दिलं जात आहे. आज आपण ज्या-ज्या गोष्टी आयात करत आहोत त्या-त्या गोष्टी भविष्यात आपण निर्यात कसे करु शकू या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत जे निर्णय नुकतेच घेण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे गुलामीत असणारी कृषी अर्थव्यवस्था मुक्त झाली आहे. जग एक विश्वासार्ह भागीदार शोधत आहे आणि भारताकडे क्षमता, सामर्थ्य आणि कार्यक्षमता आहे. भारतीय उद्योगांनी भारताविषयी जगात जो विश्वास वाढला आहे त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलं. मोदी म्हणाले की, आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहावं लागणार आहे. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. ते म्हणाले की, सध्या देश फक्त कोरोनाच्या संकटाशी लढत नाही तर अनेक संकटांना एकाच वेळी तोंड देत आहे. देशात चक्रीवादळ, टोळधाड, छोटे-छोटे भूकंप यासारखी अनेक संकटं आपल्यावर ओढावली आहे. त्यामुळे सध्या काळ आपली परीक्षा पाहत आहे. मात्र, असं असलं तरीही आपण अतिशय धैर्याने या संकटाला तोंड देत आहोत, असं मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget