एक्स्प्लोर

CAA : ममता दीदी तुम्हाला कोलकात्याची जनता शत्रू का वाटते?, मोदींचा सवाल

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि भारतीय राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीचा विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी, अशोक गेहलोत, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.

  नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि भारतीय राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीचा विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढवलाय. बंगालच्या जनतेवर विश्वास ठेवा. इथल्या जनतेवर तुमचा विश्वास नाही का? तुम्हाला येथील जनता शत्रू का वाटते? असा थेट सवालचं मोदींनी ममता बॅनर्जींना केले. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करुन काँग्रेस राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचा आरोपही मोदींनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज ममता बॅनर्जी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कोलकाताहून थेट संयुक्त राष्ट्र संघात पोहचल्या आहेत. याच ममता दीदी काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधून येणाऱ्या शरणार्थ्यांना आपण मदत करायला हवी अशी भूमिका घ्यायच्या. तसेच त्यांनी संसदेत अध्यक्षांसमोर येऊन कागद फेकायच्या. मात्र आता याच ममता दीदी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत.’ तसेच ममतादीदी आता तुम्हाला काय झालं? तुम्ही का बदललात? तुम्ही अफवा का पसरवतं आहात?, ममतादीदी सत्ता येत आणि जाते मग तुम्हाला भीती कसली वाटते? असा प्रश्नार्थक टोला मोदींनी त्यांना लगावला. तुम्ही कोणाचे समर्थन करत आहात आणि कोणाला पाठिशी घालत आहात ते देशवासियांना समजते, असा टोलाही मोदींनी ममता बॅनर्जी यांना लगावला. CAA Protest | माझे पुतळे जाळा, पण गरिबांची वाहनं जाळू नका : नरेंद्र मोदी सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासह अशोक गेहलोत, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनी सभागृहात विशिष्ट आस्थेमुळे बांगलादेशमध्ये अत्याचार झेलणाऱ्यांना भारतामध्ये आश्रय द्यायला हवा, अशी भूमिका घेतल्याची आठवण मोदींनी करुन दिली. गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच लोकांशी बोलले. नरेंद्र मोदी म्हणाले की, आंदोलनांद्वारे तुम्हाला विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शाकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन मोदींनी केले. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या सभेत मोदी बोलत होते. रामलीलामधूनच मोदींनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.

महत्त्वाच्या बातम्या

ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  
ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  
NDA मधून अधिकारी झाल्यावर किती मिळतो पगार? नेमक्या काय काय मिळतात सुविधा? जाणून घ्या सविस्तर माहिती 
NDA मधून अधिकारी झाल्यावर किती मिळतो पगार? नेमक्या काय काय मिळतात सुविधा? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशाच्या राजधानीत 800 टन कांदा दाखल, कमी दरात मिळणार कांदा 
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशाच्या राजधानीत 800 टन कांदा दाखल, कमी दरात मिळणार कांदा 

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
Embed widget