एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिला दिनी पंतप्रधान मोदींकडून कुंवर बाईंचं स्मरण
'स्वच्छ भारत अभियानासाठी कुंवर बाई यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या सत्कृत्यामुळे मी प्रेरित झालो आहे.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी महिलेचं स्मरण केलं आहे. गावात स्वच्छतागृह बांधण्यासाठी शेळ्या विकणाऱ्या 106 वर्षीय कुंवर बाईंना मोदींनी सलाम केला.
छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या कुंवर बाई यांनी गावात स्वच्छतागृह बांधण्यासाठी आपल्या उपजीविकेचं एकमेव साधन असलेल्या शेळ्या विकल्या. 15 दिवसांच्या कालावधीत 22 हजार रुपयांमध्ये हे टॉयलेट बांधण्यात आलं होतं.
'स्वच्छ भारत अभियानासाठी कुंवर बाई यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या सत्कृत्यामुळे मी प्रेरित झालो आहे.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
'छत्तीसगड दौऱ्यावर असताना कुंवर बाई यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली होती. ते क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवीन' या शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.#SheInspiresMe- Kunwar Bai, who died earlier this year at the age of 106. Hailing from Chhattisgarh, she sold her goats in order to build toilets. Her contribution towards a Swachh Bharat can never be forgotten. I am deeply inspired by her noble gesture. pic.twitter.com/eANQz01ZYE
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2018
काहीच महिन्यांपूर्वी कुंवर बाई यांची प्राणज्योत मालवली. 'बापूंचं स्वच्छ भारताचं स्वप्न साकारण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात त्या जिवंत राहतील.' असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला.I will always cherish the time when I had the opportunity to seek Kunwar Bai’s blessings during one of my visits to Chhattisgarh. Kunwar Bai lives on in the hearts and minds of all those who are passionate towards fulfilling Bapu’s dream of a clean India. #SheInspiresMe pic.twitter.com/Gdt5STszgr
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement