Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुन्हा एकदा मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाबद्दल बोलत होते. पीएम मोदी म्हणाले, "यावेळची 'मन की बात' खूप खास आहे. याचे कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहे. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. 31 जुलै या दिवशी आपण सर्व देशवासियांनो, शहीद उधम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
13 ते 15 तारखेपर्यंत 'हर घर तिरंगा' विशेष मोहिम
पंतप्रधान पुढे म्हणाले की, प्रिय देशवासियांनो, आज आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना, देशाच्या प्रवासासह आपण आपल्या चर्चेची सुरुवात केली होती. “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरूप येत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. समाजाच्या सर्व स्तरातील आणि प्रत्येक घटकातील लोक याशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.'' पंतप्रधान म्हणाले, ''आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 13 ते 15 तारखेपर्यंत 'हर घर तिरंगा' या विशेष चळवळीचे आयोजन करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येत आहे. या आंदोलनाचा एक भाग बनून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तुम्ही तुमच्या घरी तिरंगा फडकावा किंवा तुमच्या घरी लावा. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आपण सर्वजण आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरमध्ये तिरंगा लावू शकतो.आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या घरांवर आपला लाडका तिरंगा फडकविण्यासाठी देखील आपल्याला एकत्र यायचे आहे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही कसा साजरा केलात, कोणत्या विशेष गोष्टी केल्या या सर्वांची माहिती मला जरूर कळवा. असं मोदी म्हणाले.
PM मोदींनी काढली पिंगली व्यंकय्या यांची आठवण
मन की बात कार्यक्रमात पीएम मोदींनी पिंगली व्यंकय्या यांची आठवण काढली. ते म्हणाले, "2 ऑगस्ट हा आमच्या राष्ट्रध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्याजींची जयंती आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जागतिक स्तरावर कोरोनाविरुद्ध आयुषने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगात आयुर्वेद आणि भारतीय औषधांबद्दल आकर्षण वाढत आहे. नुकतीच जागतिक आयुषची परिषद झाली. यामध्ये सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. इंडियन व्हर्च्युअल हर्बेरियम जुलै महिन्यात लाँच करण्यात आले. आपण आपल्या मुळांशी जोडण्यासाठी डिजिटल जगाचा वापर कसा करू शकतो याचेही हे एक उदाहरण आहे. असं मोदी यावेळी म्हणाले.
मध उत्पादनातून शेतकऱ्यांचे जीवन बदलतंय
मोदी म्हणाले, शेतकऱ्यांबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, "मधाचा गोडवा आपल्या शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे आणि त्यांचे उत्पन्न वाढवत आहे. मध आपल्याला केवळ चवच देत नाही तर आरोग्यही देते. आज मध उत्पादनात इतक्या शक्यता आहेत की व्यावसायिक शिक्षण घेणारे तरुणही यातूनच आपला स्वयंरोजगार बनवत आहेत. आपल्या देशातही जत्रांना खूप सांस्कृतिक महत्त्व आहे. जत्रेमुळे माणसे जोडली जोडतात.