Rice Sowing : मागील वर्षीपेक्षा यंदाच्या खरीप हंगामात (kharif season) भाताची लागवड (Rice Sowing ) कमी झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. चालू खरीप हंगामात  231.59 लाख हेक्‍टरवर भाताची पेरणी झाली आहे. तर मागदील वर्षी यावेळी  267.05 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मागील वर्षीपेक्षा यावर्षी भाताच्या पेरणी क्षेत्रात 35.46 लाख हेक्‍टरची घट झाली आहे. दरम्यान, याबाबत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चालू खरीप हंगामात भात पेरणीची कमतरता भरुन निघण्याची शक्यता असल्याची माहिती नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. 


यावर्षी भात लागवडीचे क्षेत्र 35.46 लाख हेक्‍टरने घटले 


चालू खरीप हंगामात भात पेरणी मागील वर्षीपेक्षा कमी झाली आहे. मात्र, ही कमतरात भरुन निघेल असा विश्वास कृषीमंत्री तोमर यांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी भात लागवडीचे क्षेत्र 35.46 लाख हेक्‍टरने घटले आहे. या खरीपात आतापर्यंत पश्चिम बंगाल (10.62 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (6.68. लाख हेक्टर), बिहार (5.61 लाख हेक्टर), झारखंड (4.72 लाख हेक्टर), तेलंगणा (4.06 लाख हेक्टर) मध्ये भाताची लागवड कमी  झाल्याची नोंद कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. 


एकूण तांदूळ उत्पादनापैकी 80 टक्क्यांहून अधिक उत्पादन या हंगामात होते


ओडिशा, छत्तीसगड, त्रिपुरा आणि आसाममध्येही धानाच्या लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. दरम्यान, भात हे मुख्य खरीप पीक आहे. देशाच्या एकूण तांदूळ उत्पादनापैकी 80 टक्क्यांहून अधिक उत्पादन या हंगामात होते. जूनमध्ये नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभापासून भातासह खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. भारतीय हवामान खात्याने यावर्षी नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. संपूर्ण देशात 1 जून ते 27 जुलै दरम्यान 10 टक्के जास्त मान्सूनचा पाऊस झाला आहे. परंतू, त्याच कालावधीत पूर्व आणि ईशान्य भारतात  15 टक्के तूट नोंदवली गेली. आयएमडीच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोराम आणि मणिपूरमध्ये पावसाची कमतरता होती. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक आणि सर्वोच्च निर्यातदार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: