PM Narendra Modi : आजपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही अनेक वेळा अभिनेत्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत यांचे डुप्लिकेट्स (लूक लाईक) पाहिले असतील. यांचा लूक इतका हुबेहूब असतो की, खऱ्या-खोट्यामध्ये गोंधळ होतो. तुम्ही सोशल मीडियावर सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण आणि गोविंदा यांसारख्या अभिनेत्यांच्या लूकसारखे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही असाच एक हुबेहूब दिसण्यासारखा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक लूक चर्चेत आहे, ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


पाहा व्हिडीओ : 






पंतप्रधान मोदींसारखा दिसणाऱ्या या डुप्लिकेटचं नाव अनिल ठक्कर असं आहे. ते अहमदाबादमध्ये पाणी पुरी विकण्याचं काम करतात. त्यांचा साईड फेस आणि गेटअप पंतप्रधान मोदींसारखाच आहे, त्यामुळे लोक त्यांना फक्त मोदी या नावाने ओळखतात. ते म्हणतात की, त्यांच्यात आणि पंतप्रधानांमध्ये फारसा फरक नाही, कारण मोदीजी चायवाला होते आणि मी पाणीपुरी वाला. वयाच्या 15व्या वर्षापासून पाणीपुरी विकत असल्याचे अनिल ठक्कर यांनी सांगितले. जेव्हा त्यांनी या कामाची सुरुवात केली तेव्हा ते फक्त 25 पैशांत लोकांना पाणीपुरी खाऊ घालायचे. 


पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर eatinvadodara नावावरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, 'मोदीजींचा डुप्लिकेट पाणीपुरी विकत आहे.' हा व्हिडीओ आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, 5 लाख 52 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे.


त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण 70 टक्के आवाजही सेम असल्याचं सांगत आहेत, तर काहीजण हुबेहुब चेहरा म्हणत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'काका, तुम्हाला मोदीजींच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका मिळू शकते, प्रयत्न करा', तर दुसऱ्या यूजरने लिहिले की 'कोई नहीं चाचा…एक दिवस तुम्हीही मुख्यमंत्री व्हाल'. अशा गमतीशीर कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


PM Modi Jacket : लक्ष वेधून घेणारं पंतप्रधानांचं प्लास्टिकचं जॅकेट लवकरच बाजारात, सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार