Rahul Gandhi vs PM Modi Speech in Loksabha: गेल्या दोन दिवसांपासून संसदेतील (Parliament) वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी राहुल गांधींनी (Rahul Gandhi Speech in Lok Sabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर (PM Modi) सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या (Gautam Adani) मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर (Central Government) अनेक प्रश्न उपस्थित केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी काल (बुधवारी) लोकसभेत भाषण (Lok Sabha Speech) केलं. यावेळी पीएम मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसला (Congress) जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काल लोकसभेत मोदींनी (PM Modi Speech in Lok Sabha) तब्बल 88 मिनिटं भाषण केलं. पण या 88 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या नावाचा उल्लेखही केला नाही. 


पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर, मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणाची तुलना केली जाऊ लागली. यावरुन अनेक तर्क-वितर्क लावले गेले. राजकीय विश्लेषकांनी दोघांच्याही भाषणाचं विश्लेषणही केलं. पाहुयात दोघांच्या भाषणातील फरक... 


मंगळवारी राहुल गांधी यांनी लोकसभेत 51 मिनिटांचं भाषण केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी 45 मिनिटं फक्त अदानी आणि अदानी यांच्याशी संबंधित वादांवर चर्चा केली होती. राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आपलं भाषण केवळ अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यापुरतं मर्यादित ठेवलं. यावेळी लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी आणि यादरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत एक फोटोही आणला होता. त्या फोटोत गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी एकत्र दिसत होते. राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात सुमारे 60 वेळा गौतम अदानी यांचं नाव घेतलं होतं.


मोदी आणि राहुल यांच्या भाषणातील फरक काय? 


बुधवारी पंतप्रधान मोदींनी लोकसभेत तब्बल 88 मिनिटांचं भाषण केलं. यावेळी मोदींनी सर्वात जास्त '140 कोटी भारतीय' या शब्दाचा उल्लेख केला. यानंतर त्यांनी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचाही उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी गेल्या 9 वर्षांत आपल्या सरकारच्या कामगिरीची मोजदाद केली आणि 88 मिनिटांच्या या भाषणात केवळ 6 मिनिटंच होती, जेव्हा त्यांनी थेट काँग्रेस पक्ष आणि विरोधी नेत्यांना टोला लगावला. महत्त्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भाषणात गौतम अदानी किंवा राहुल गांधी यांचा एकदाही उल्लेख केला नाही. 


पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं की, "गेल्या 9 वर्षात विरोधकांनी त्यांच्यावर फक्त आरोप केलेत, मात्र कधीही टीका केली नाही आणि ज्या दिवशी विरोधक खर्‍या अर्थानं टीका करतील, त्या दिवशी ते नक्कीच उत्तर देतील."


राहुल गांधींकडून अनेक प्रश्न उपस्थित 


राहुल गांधींनी मंगळवारी दिवशी पीएम मोदी आणि केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. गौतम अदानी पंतप्रधान मोदींच्या जवळचे असल्यामुळे त्यांना भारत आणि परदेशात मोठी कंत्राट मिळत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला, अदानी किती वेळा पंतप्रधान मोदींसोबत विदेश दौऱ्यावर गेले होते? पंतप्रधान मोदींनी अदानीला किती भेटी दिल्या? अदानींनी किती भेटींनंतर त्या देशाला भेट दिली आणि तुमच्या भेटीनंतर अदानीला किती देशांमध्ये कंत्राट मिळाले? असे अनेक प्रश्न अदानींनी पंतप्रधान मोदींना विचारले होते. 


एवढंच नाहीतर मंगळवारी राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केलं, त्यावेळी ते एक फोटो घेऊन आले होते. संसदेत राहुल गांधींनी फोटो झळकावला, ज्यामध्ये गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी एकत्र दिसत होते. मात्र पंतप्रधान मोदींनी भाषण करताना राहुल गांधींचा उल्लेखही केला नाही. पण अनुल्लेखानं मोदींनी टीकास्त्र मात्र डागलं. 


अनुल्लेखानं राहुल गांधींवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र 


राहुल गांधी यांनी भाषण करताना मोदी आणि अदानी यांचा वारंवार उल्लेख केला. पण पंतप्रधान मोदींनी मात्र राहुल गांधींचं संपूर्ण भाषणात एकदाही नाव घेतलं नाही. पण अनुल्लेखानं मोदींनी राहुल गांधींसह काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले की, 'हे लोक पूर्वी म्हणायचे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत कमकुवत होतोय. भारत आता इतर देशांना धमकावतोय, असं तेच लोक आता सांगतायत. याशिवाय पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना टोलाही लगावला. पंतप्रधान म्हणाले की, काल (मंगळवारी) त्यांना चांगली झोप लागली असावी आणि त्यांच्या भाषणानंतर त्यांचे समर्थक खूपच उड्या मारत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी हे सांगितलं त्यावेळी राहुल गांधी सभागृहात उपस्थितच नव्हते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rahul Gandhi: राहुल गांधींच्या भाषणाचा 'तो' भाग लोकसभेच्या कामकाजातून वगळला; विचारलेले प्रश्नही कामकाजात नाहीत