एक्स्प्लोर

PM Vishwakarma: पाठीच्या कण्याप्रमाणेच देशासाठी महत्त्वाची 'विश्वकर्मा योजना' : पंतप्रधान मोदी

PM Vishwakarma Scheme: 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कलाकार आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्रंही दिली.

PM Vishwakarma: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी 'पीएम विश्वकर्मा' (PM Vishwakarma Scheme) योजनेचा शुभारंभ केला. दिल्लीतील द्वारका येथील 'इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर' (IICC) येथे आयोजित कार्यक्रमात मोदींनी या योजनेचा प्रारंभ केला. ही योजना आशेचा नवा किरण असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी विविध कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्रंही दिली. 

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. हा दिवस आपल्या पारंपारिक कारागिरांना आणि शिल्पकारांना समर्पित आहे. मी सर्व देशवासियांना विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देतो. ते म्हणाले की, भगवान विश्वकर्मा यांच्या आशीर्वादानं आजपासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना हाताची कौशल्य आणि साधनं घेऊन काम करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण म्हणून येत आहे. 

"यशोभूमीच्या कार्यात विश्वकर्मा बंधू-भगिनींची जिद्द दिसून आली"

द्वारका येथे बांधलेली 'यशोभूमी' देशाला समर्पित करताना पंतप्रधान म्हणाले की, आज देशाला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र-यशोभूमीही मिळाली. येथे ज्या प्रकारचं कार्य केलं गेलं, त्यावरून माझ्या विश्वकर्मा बंधू-भगिनींची तपस्या आणि तपश्चर्या दिसून येते. 'यशोभूमी'मध्ये 11 हजार लोक एकत्र बसू शकतात. मुख्य हॉल आणि भव्य बॉलरूमसह ही 8 मजली इमारत 73 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेत बांधली गेली आहे. त्यात 15 अधिवेशन कक्ष आणि 13 बैठक कक्षही करण्यात आले आहेत. येथे केवळ बैठकाच आयोजित केल्या जाऊ शकत नाहीत तर परिषदा आणि प्रदर्शनं देखील आयोजित केली जाऊ शकतात.

"विश्वकर्मा मित्रांची कलाकुसर जगभर पोहोचेल"

पंतप्रधान म्हणाले की, मी त्या हजारो विश्वकर्मा मित्रांना सांगू इच्छितो की, हे एक खूप मोठं केंद्र असेल, जे तुम्ही प्रत्येक गावात घडवलेल्या कलाकृतीला जगासमोर नेण्याचं एक शक्तिशाली माध्यम असेल. हे तुमची कला, तुमची कौशल्य जगासमोर दाखवेल. भारताची स्थानिक उत्पादनं जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठीही मोठी भूमिका बजावेल. हजारो वर्षांपासून भारताच्या समृद्धीच्या मुळाशी असलेले मित्रच आपले विश्वकर्मा आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाले. जसा पाठीचा कणा आपल्या शरीरात भूमिका बजावतो, त्याचप्रमाणे हे विश्वकर्मा साथीदार सामाजिक जीवनात भूमिका बजावतात, असंही मोदी म्हणाले आहेत. 

"स्थानिकांसाठी आवाज उठवण्याचं आवाहन"

पंतप्रधान मोदी संबोधित करताना म्हणाले की, या विश्वकर्मा दिनी आपण स्थानिकांसाठी आवाज उठवण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला पाहिजे. आता गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दिवाळीसह अनेक सण येत आहेत. मी सर्व देशवासीयांना स्थानिक खरेदी करण्याचं आवाहन करेन. व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून लोकांना स्थानिक विक्रेत्यांकडून आवश्यक वस्तू खरेदी करण्याची विनंती केली जाते. यामध्ये घर सजवण्याच्या वस्तूंपासून छोट्या वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget