एक्स्प्लोर

PM Modi In Office : 2014 पासून गेल्या 9 वर्षात पंतप्रधान मोदी यांनी किती दिवस सुट्टी घेतली? RTI मध्ये धक्कादायक माहिती उघड

PM Modi Leave : आरटीआय कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा केली होती की, 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पदभार सांभाळल्यानंतर आतापर्यंत किती दिवस सुट्टी घेतली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ओळखलं जातं. अशा वेळी सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे पंतप्रधान किती दिवस काम करतात आणि त्यांना किती दिवस सुट्टी मिळते. दरम्यान, आता माहिती अधिकारामुळे पंतप्रधानांनाबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती दिवस सुट्टी घेतली याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

9 वर्षात पंतप्रधान मोदी यांनी किती दिवस सुट्टी घेतली?

आरटीआय कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा केली होती की, 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पदभार सांभाळल्यानंतर आतापर्यंत किती दिवस सुट्टी घेतली आहे. यानंतर समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे 2014 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. इतकंच नाही तर गेल्या 9 वर्षात त्यांनी देश-विदेशातील 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. पुण्यातील आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांना आरटीआयद्वारे ही माहिती मिळाली.

पंतप्रधानांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही

आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) आरटीआयद्वारे माहिती मागवली होती की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून किती दिवस कार्यालयात हजेरी लावली. यावर पीएमओकडून दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत कामावर असतात. पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. पीएमओने 31 जुलै 2023 रोजी हे उत्तर दिलं आहे.

यापूर्वीच्या आरटीआयमध्ये समोर आलेली माहिती 

यापूर्वी 2015 मध्येही पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीबाबत आरटीआयद्वारे उत्तर मागवण्यात आलं होतं. तेव्हाही पंतप्रधान मोदी यांनी सुट्टी घेतली नसल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, हा फक्त पहिल्या वर्षीचा आकडा होता. नुकत्याच समोर आलेल्या आरटीआयमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती समोर आली आहे.

अनुराग ठाकूर यांनी 20 वर्षे रजा न घेतल्याचं सांगितलं होतं

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेत 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल म्हणजेच गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करताना, मोदींनी 20 वर्षांत एकही रजा घेतली नसल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान मोदी 24 तास देशासाठी काम करतात, असंही त्यांनी सांगितलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Embed widget