पंतप्रधान नरेंद्र मोदी 68वा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68वा जन्मदिवस आहे. मोदी आपला वाढदिवस वाराणसीतील शाळेतील मुलांसोबत साजरा करणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68वा वाढदिवस आहे. मोदी आपला वाढदिवस वाराणसीच्या शाळेतील मुलांसोबत साजरा करणार आहेत. वाराणसीच्या नरउर गावात जाऊन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. याशिवाय आपल्या वाढदिवशी जवळपास 600 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभही मोदी करणार आहे.
वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसीत त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नरउरच्या प्राथमिक शाळेत स्मार्ट वर्ग सुरू होणार असून त्याची पाहणी मोदी करणार आहेत. चार वर्षाच्या कार्यकाळातील मोदींची आपल्या मतदारसंघातील 14वा दौरा आहे.
मोदी जवळपास 19 तास काशीमध्ये असणार आहेत. जुन्या काशीसाठी इंटिग्रेटेड पावर डेव्हलपमेंट स्कीम आणि बीएचयूमध्ये अटल इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सभा या ठिकाणी घेणार आहेत. तसेच काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजाही करणार आहेत.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News





















