PM Modi Birthday: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा 73 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात जय्यत तयारी सुरू आहे, भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, एका सामान्य जन्मलेल्या सामान्य माणसाचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास अत्यंत अनोखा होता, यातील काही तथ्य आज जाणून घेऊया. पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्रिपद ते पंतप्रधानपदापर्यंत मजल कशी मारली? माहीत आहे का? पंतप्रधान मोदींना आयुष्यात नक्की बनायचं काय होतं हेही क्वचितच कुणाला तरी माहीत असेल.


पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेल्या काही रंजक गोष्टी पाहूया. पंतप्रधान मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. त्यांचे वडील दामोदरदास मोदी चहा विकायचे, यामध्ये दिवंगत आई हिराबेन देखील मदत करत असत. याशिवाय त्यांच्या आई इतर लोकांच्या घरात धुणीभांडीची कामंही करत होत्या. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी लहानाचे मोठे झाले. खडतर प्रवासानंतर ते मुख्यमंत्री बनले, त्यानंतर स्वतंत्र भारतात (देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात) जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान देखील ठरले. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं.


पंतप्रधान मोदींचा संन्यासी बनण्याचा निर्णय?


पंतप्रधान मोदींचं लग्न जशोदाबेन मोदींशी झालं होतं, पण त्यांना हे नको होतं. न्यूज 18 च्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी संन्यासी बनण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी देशाच्या उत्तर भारतापासून ते ईशान्य भारतापर्यंत प्रवास केला, यानंतर तो दोन वर्षांनी स्वगृही परतले.


RSS मध्ये झाले सामील?


भारत फिरल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) प्रवेश केला. 1972 मध्ये अहमदाबाद, गुजरात येथे त्यांना RSS चे प्रचारक बनवण्यात आलं. संघात आल्यानंतर त्यांचा दिवस पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होत होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कधी मागे वळून पाहिलं नाही.


गुजरातमध्ये रचला इतिहास


आरएसएसने मोदींना 1985 मध्ये भाजपकडे सोपावलं. त्यानंतर त्यांचं काम पाहता भाजपने मोदींना 1987 मध्ये गुजरात भाजपचं सरचिटणीस बनवलं, या कारकिर्दीत मोदींनी स्वतःला चांगलंच सिद्ध केलं. मोदींच्या भाजप प्रवेशानंतर भाजपने अहमदाबाद महापालिका निवडणुकीत प्रथमच विजय मिळवला. 1990 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर 1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपला 121 जागा मिळाल्या. पक्षातला हा बदल पाहता मोदींना 1995 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं.


मुख्यमंत्री ते पंतप्रधान पदापर्यंत असा होता प्रवास


नरेंद्र मोदी 2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, 2014 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं. त्यानंतर 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. भाजपला पूर्ण बहुमत मिळालं. पुढील लोकसभा निवडणुकीत, म्हणजेच 2019 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले. आता पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या मिळतील, अशी आशा भाजपला आहे.


ओबीसींपर्यंत पोहोचण्याची योजना


पंतप्रधान मोदींच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी 'सेवा पखवाडा' सुरू करून भाजप देशभरात विविध कल्याणकारी उपक्रमांचं आयोजन करत आहे. हे अभियान 2 ऑक्टोबर, म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपर्यंत सुरू राहणार आहे.


रविवारी विश्वकर्मा जयंती देखील आहे आणि त्यावेळी पंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना 'प्रधानमंत्री विश्वकर्मा' लाँच करतील, ज्याचा उद्देश कारागीर आणि पारंपारिक कौशल्यांमध्ये गुंतलेल्या इतरांना मदत करणं हा असेल. या पारंपारिक व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक मोठ्या प्रमाणात इतर मागासवर्गीय कॅटेगरीतून (ओबीसी) येतात. 13,000 कोटी रुपयांच्या खर्चाची ही योजना या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या वर्गापर्यंत पोहोचण्याचा सत्ताधारी भाजपचा एक प्रयत्न असेल.


पंतप्रधान मोदी विशेष दिवशी आणखी काय करणार?


पंतप्रधान मोदी रविवारी (17 सप्टेंबर) द्वारका येथील यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटरच्या (IICC) पहिल्या टप्प्याचं आणि दिल्ली मेट्रोच्या विमानतळ एक्सप्रेस लाईनच्या विस्तारित भागाचं उद्घाटन देखील करतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Popular Global Leaders: जगात पुन्हा भारताचा डंका! जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींची निवड