PM Modi Interesting Facts : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. एका सामान्य कुटुंबातून आलेले पंतप्रधान मोदी आज जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत सामील झाले आहेत.



सार्वजनिक जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून  
पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे प्रचारक म्हणून झाली आणि हळूहळू ते भारतीय जनता पक्षाचे एक बोलके नेते म्हणून उदयास आले. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी 2001 ते 2014 दरम्यान 12 वर्षांहून अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.


 


विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 73 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी विश्वकर्मा जयंतीही आहे.  या निमित्त पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे



पंतप्रधान मोदींबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घ्या


1. पंतप्रधान मोदींची राजकारणात सुरुवात 8 व्या वर्षी झाली, जेव्हा ते लक्ष्मणराव इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली RSS ज्युनियर कॅडेट बनले. 



2. पंतप्रधान मोदींना तरुणपणी संन्यास घेण्याची इच्छा होती. त्यांनी जवळजवळ दोन वर्षे हिमालयात एकांतात घालवली, जिथे त्यांनी ध्यान केले आणि हिंदू धर्माचे तत्वज्ञान स्वीकारले.


 


3. नरेंद्र मोदी यांची 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा ते राज्य विधानसभेचे सदस्य नव्हते. नंतर त्यांनी पोटनिवडणूक जिंकली.


 


4. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मास आलेले प्रथम भारतीय पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळाला आहे.


 


5. राजकारणाच्या पलीकडे पंतप्रधान मोदी हे उत्तम लेखकही आहेत. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत.


 


6. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी एका दिवसाचीही रजा घेतली नाही. तसेच तीनपेक्षा जास्त वैयक्तिक कर्मचारीही त्यांनी ठेवले नाही.


 


7. पंतप्रधान मोदी यांना जागतिक फॅशन आयकॉन देखील मानले जाते. त्यांचे 'मोदी जॅकेट' आणि 'मोदी कुर्ता' खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा आवडता कपड्यांचा ब्रँड 'जेड ब्लू' हा अहमदाबादचा आहे.


 


8. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.


 


9. पंतप्रधान मोदींचे X(पूर्वीचे ट्विटर) वर जवळपास 92 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय जागतिक नेत्यांपैकी एक आहेत.


 


10. शालेय जीवनात पंतप्रधान मोदी नाटकात अभिनय करायचे. नाटकांची तयारी आणि स्टेजिंग करण्यातही ते निष्णात आहेत.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Seva Month : आजपासून पुढील महिनाभर राज्यात 'सेवा महिना', वाचा नेमका काय उपक्रम राबवण्यात येणार