नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार जाहीर झाला. पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. फ्रान्सचे अध्यक्ष एमेन्युएल मॅक्राँन आणि मोदी या दोघांना हा सन्मान प्राप्त झाला. धोरणात्मक नेतृत्व या विभागात त्यांना हा सन्मान मिळाला.


पर्यावरण क्षेत्रात मोलाचं कार्य करणाऱ्या जगातील सहा व्यक्तींना संयुक्त राष्ट्राने सर्वोच्च पर्यावरण सन्मान ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ने गौरवलं आहे.

मोदींना आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं नेतृत्त्व आणि 2022 पर्यंत भारताला वन टाईम यूज अर्थात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प, यामुळे मोदींना हा सन्मान बहाल करण्यात आला.

पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष एमेन्युएल मॅक्राँन आणि मोदी या दोघांना संयुक्तरित्या हा सन्मान प्राप्त झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्राकडून हा सन्मान मिळाल्यामुळे भाजप नेत्यांनी अभिनंदनाचे ट्विट केले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मोदींचं अभिनंदन केलं.