एक्स्प्लोर

आंबेडकरांचे भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधानांनी मौन सोडावं : मेवाणी

"मी व्यवसायाने वकील आहे, त्यामुळे संविधानाचं महत्त्व माहित आहे. कायदा आणि संविधानाच्या कक्षेत राहूनच मी सगळी कामं केली आहेत," असं जिग्नेश मेवाणी म्हणाला.

नवी दिल्ली : स्वत:ला आंबेडकरांचे भक्त म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरेगाव भीमाच्या हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? असा सवाल गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानीने केला. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत तो बोलत होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुजरातमधील दलित नेता आणि आमदार जिग्नेश मेवाणीने स्पष्टीकरण दिलं आहे. जिग्नेश मेवाणी म्हणाला की, "मी कोरेगाव भीमाला गेलो नाही, प्रक्षोभक भाषण केलं नाही, महाराष्ट्र बंदमध्येही सहभागी झालो नाही तर माझ्यामुळे हिंसा कशी झाली हा प्रश्न मला पडला आहे." "मी व्यवसायाने वकील आहे, त्यामुळे संविधानाचं महत्त्व माहित आहे. कायदा आणि संविधानाच्या कक्षेत राहूनच मी सगळी कामं केली आहेत," असं जिग्नेश मेवाणी म्हणाला. पंतप्रधांनी मौन सोडावं यावेळी जिग्नेश मेवाणीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्ला केला. "दलितांना शांततेने मोर्चा काढण्याचा हक्क नाही का? पंतप्रधानांनी कोरेगाव भीमा हिंसाचारावर मौन सोडावं. देशात दलित सुरक्षित नाहीत. दलितांबाबत पंतप्रधानांची काही जबाबदारी आहे की नाही. स्वत:ला आंबेडकरांचे भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधांनी मौन सोडावं," असं जिग्नेश मेवाणी म्हणाला. 9 जानेवारीला दिल्लीत हुंकार रॅली नवी दिल्लीत 9 जानेवारीला हुंकार रॅली काढणार असल्याची घोषणा जिग्नेश मेवाणी केली. जिग्नेश मेवाणीने सांगितलं की, "रॅली संपल्यानंतर एका हातात मनुस्मृती आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन पंतप्रधान कार्यालयात जाणार आहोत. तुम्ही काय निवडणार, भारतीय संविधान की मनुस्मृती? असा प्रश्न यावेळी मोदींना विचारणार आहे." माझी प्रतिमा मलिन करण्याचा संघ आणि भाजपचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या लोकांना माझी प्रतिमा मलिन करायची आहे. जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जात आहे. गुजरात निवडणुकीत भाजपचं 150 जागांचं स्वप्न भंगलं, त्यामुळे त्यांना 2019 मध्ये धोका दिसत आहे. त्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप जिग्नेश मेवाणीने केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Embed widget