एक्स्प्लोर

मोदींच्या 'गुड मॉर्निंग' मेसेजला भाजप खासदारच उत्तर देत नाहीत!

पंतप्रधान मोदी दररोज 'नमो अॅप'वरुन सर्व खासदारांना 'गुड मॉर्निंग'चा मेसेज पाठवतात. पण या मेसेजला 4 ते 5 खासदार सोडता कोणताही खासदार उत्तर देत नाही. अशी नाराजी खुद्द मोदींनीच व्यक्त केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी दररोज 'नमो अॅप'वरुन सर्व खासदारांना 'गुड मॉर्निंग'चा मेसेज पाठवतात. पण या मेसेजला 4 ते 5 खासदार सोडता कोणताही खासदार उत्तर देत नाही. अशी नाराजी खुद्द मोदींनीच व्यक्त केली. भाजपच्या संसदीय मंडळच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मोदींच्या नाराजीनंतर सर्वच खासदारांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक संपताच सर्व खासदारांना मेसेज पाठवण्यात आले की, त्यांनी आपलं 'नमो अॅप' नियमितपणे तपासावं. जर ते अॅक्टिव्हेट नसेल तर तात्काळ अॅक्टिव्ह करुन घ्यावं. या मेसेजनंतर दुपारी जेवणाच्या वेळी भाजपचे सर्वच खासदार 'नमो अॅप' अपडेट करताना दिसून आले. खरं तर नमो अॅप अॅक्टिव्ह करण्यासाठी ईमेल आयडी आणि फोन नंबर पुरेसा असतो. त्यामुळे काही खासदारांनी आपल्या फोन नंबरऐवजी आपल्या स्वीय सचिवांचे नंबर दिले होते. तर काही जणांनी आपले फोन बदलल्यानं नमो अॅप अॅक्टिव्ह केलं नव्हतं. नमो अॅप लाँच झाल्यानंतर पीएमओकडून खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले होते. ज्यामुळे त्यांना त्या-त्या ग्रुपमध्ये थेट मेसेज पाठवता येत होते. असे ग्रुप तयार केल्यानंतर पंतप्रधान मोदी स्वत: सर्व खासदार, मंत्र्यांना गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवत होते. पण तंत्रज्ञानाबाबतची उदासिनता म्हणा किंवा नमो अॅप अॅक्टिव्ह न केल्यामुळे बरेच खासदार मोदींच्या मेसेजला कोणतंही उत्तर देत नव्हते. यावरुन मोदींनी नाराजी व्यक्त करताच सर्व खासदारांनी आपलं नमो अॅप अॅक्टिव्हेट केलं. या सर्व प्रकारानंतर भाजपच्या आयटी सेलमधून एका कार्यकर्त्याला संसदेत पाठवण्यात आलं. त्यानंतर या कार्यकर्त्यानं प्रत्येक खासदार, मंत्र्यांचे मोबाइल नंबर तपासले. ज्यामधील 40% खासदारांचे नंबरच बदलले होते. तर भाजपच्या 19 मुख्यमंत्र्यांपैकी 13 मुख्यमंत्र्यांचे देखील मोबाइल नंबर बदलले होते. त्यामुळे या कार्यकर्त्यानं सर्व खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे मोबाइल क्रमांक घेतले आणि त्यांना 'नमो अॅप' अपडेट करण्याची विनंती केली. सुत्रांच्या माहितीनुसार, सर्व खासदार आणि मंत्र्यांनी 'नमो अॅप' अपडेटही केलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी उद्या गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवल्यानंतर खासदार आणि मंत्री त्यांना त्याचं उत्तर नक्कीच देतील.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Lockdown Rumours: लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, केंद्रीय मंत्र्याचं स्पष्टीकरण
लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, केंद्रीय मंत्र्याचं स्पष्टीकरण
Petrol Diesel LPG Crisis Update : पेट्रोल, डिझेल एलपीजी..., भारतात सध्या किती साठा?, केंद्र सरकारने इंधन केंद्रांवरील सध्याची सगळी दिली माहिती
पेट्रोल, डिझेल एलपीजी..., भारतात सध्या किती साठा?, केंद्र सरकारने इंधन केंद्रांवरील सध्याची सगळी दिली माहिती

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Hardik Pandya: 'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Team India Schedule : 9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
Embed widget