https://twitter.com/narendramodi/status/846541842468384769
गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाडव्याच्या निमित्तानं मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सिद्धीविनायकाच्या काकड आरतीला हजेरी लावत भाविकांनी मराठी नववर्षाचं स्वागत केलं.
मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं आहे. आज सकाळी ८ वाजून २७ मिनीटांनी श्री. शालिवाहन शके १९३९ हमलंबीनाम संवत्सचारा प्रारंभ होऊन नतून वर्ष सुरु होईल. दरम्यान, पुढच्यावर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर म्हणजे १८ मार्च २०१८ रोजी येणार असल्याचं खगोल अभ्सासकांचं म्हणणं आहे.
मुंबईसह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात महारांगोळी साकारण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त या महारांगोळीत त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत. २५ महिला आणि २० पुरुष कलाकारांनी मिळून २८ तासांमध्ये ही रांगोळी साकारली. गणेश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे.
डोंबिवलीबरोबरच ठाण्यातही नववर्ष जल्लोषात साजरं करण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाण्यातल्या मासुंदा तलावात दीपोत्सव तसंच गंगापूजन करण्यात आलं. कोपिनेश्वर ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या या दीपोत्सवाला महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह आमदार संजय केळकर यांनी हजेरी लावली. कोपिनेश्वर मंदिरात दीप प्रज्वलित केल्यानंतर मासुंदा तलावाच्या काठावर हजारो दिव्याची आरास करण्यात आली.