एक्स्प्लोर

देशातील कोविडच्या स्थितीवर पंतप्रधान आज सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा, उद्धव ठाकरे यांचाही सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत.

PM Modi High Level Meeting: देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होणार आहेत. आजारपणानंतर पहिल्या मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होत असल्याने त्यांच्या सहभागाबद्दल उत्सुकता लागली आहे.

सध्या देशातमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान,रविवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार या सर्वांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि मिशन मोडवर प्रौढांसाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी, राज्यांची परिस्थिती, तयारी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसीकरण हे प्रभावी आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण पूर्ण करावे असे वेळोवेळी पंतप्रधान यांनी आवाहन केले आहे. दरम्यान, भारतात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून देखील माहिती देण्यात आली आहे. भारतासह जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जगभरात मागील आठवडाभरात सरासरी 25 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जगभरातील अॅक्टिव रुग्णाची संख्या वाढून 4 कोटी 49 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,  ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात आतापर्यंत 115 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने होत आहे. आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिका, युके, कॅनडा, डेन्मार्क येथे डेल्टाच्या तुलनेत ओमायक्ऱनचे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण घटले आहे.

देशातील काही राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.  येथील पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढतच आहे. देशातील 19 राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर चार राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या पाच हजार इतकी झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget