नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेनं स्थापन केलेल्या, स्वतंत्र भारत सरकारला आज 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला. स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त देशाच्या पंतप्रधानानं लाल किल्लावरुन झेंडा फडकावण्याची ही पहिलीच घटना आहे. तसेच मोदींनी आझाद हिंद फौजेच्या म्युझियमचंही उद्धाटन केलं. 21 ऑक्टोबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आझाद हिंद सरकार'ची स्थापना केली होती.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, देशाचे स्वातत्र्य मिळवून देणे हा एकच हेतू नेताजींचा होता. भारताने आत्तापर्यंत अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. तरी देखील अजूनही नव्या उंचीवर पोहोचणे बाकी आहे. भारताचे हेच लक्ष पूर्ण करण्यासाठी देशातील 130 कोटी लोक नव्या भारताचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत. ती संकल्पना सुभाष बाबूंनची असल्याचे मोदींनी म्हटले.
लाखो जणांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वराज्य प्राप्त झालं आहे. आता ती आपली जबाबदारी आहे की हे स्वराज आपण सुराज्याद्वारे जपले पाहिजे. गेल्या चार वर्षांत देशाचे संरक्षण खातं मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. सरकारतर्फे देशात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. यामध्ये सर्जिकल स्ट्राइक किंवा नेताजींच्या मृत्यूसंबंधीची कागदपत्रे सार्वजनिक करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश असल्याचे मोदी म्हणाले.
इतकेच नाही तर सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पंतप्रधान मोदी अंदमान-निकोबार येथे जाणार आहेत. तेथे ते सेल्युलर कारागृहालाही भेट देणार आहेत. या कारागृहात स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची.
स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त प्रथमच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2018 03:00 PM (IST)
स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त देशाच्या पंतप्रधानानं लाल किल्लावरुन झेंडा फडकावण्याची ही पहिलीच घटना आहे. तसेच मोदींनी आझाद हिंद फौजेच्या म्युझियमचंही उद्धाटन केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -