एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींना TRP च्या राजकारणात रस : राहुल गांधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ प्रसिद्धीच्या राजकारणात रस असल्याचा घणाघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच काँग्रेसच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आजारपणामुळे बैठकीला हजर राहू शकल्या नाहीत. त्यामुळे राहुल गांधींनी पहिल्यांदाच या बैठकीचं नेतृत्त्व केलं. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मोदींना फक्त टीआरपीच्या राजकारणात रस आहे.
'मोदींमुळे दहशतवाद्यांना संधी मिळाली'
राहुल गांधी म्हाणाले की, "पंतप्रधानांनी राजकारणात टीआरपीची हवा निर्माण केली आहे. यामुळे दहशतवाद्यांना त्यांचे मनसुबे पूर्ण करण्याची संधी मिळाली. पण याची किंमत कोण चुकवत आहे? किमान पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालय तरी नक्कीच नाही. त्यांच्याऐवजी आमचे सैनिक आणि त्यांचं कुटुंब किंमत चुकवत आहे. आतापर्यंत 85 सैनिक शहीद झाले आहेत. मागील 10 वर्षांत हा आकडा सर्वाधिक आहे."
नरेंद्र मोदी स्वत:च्याच प्रेमात
पंतप्रधानांवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, "नरेंद्र मोदी असे पंतप्रधान आहेत, जे स्वत:च्याच प्रेमात आहेत. टीआरपीनुसार ते संपूर्ण स्ट्रॅटेजी बनवतात. पंतप्रधानांनी संधीसाधूपणा करत काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी युती केली. यामुळे देशाला मोठं नुकसान होत आहे."
"आम्ही कधीही असा पंतप्रधान दिला नाही, ज्याने स्वत:ची इमेज बनवण्यासाठी देशाच्या जनतेला अडचणीत टाकलं नाही. पंतप्रधानांच्या अहंकार आणि नाकर्तेपणामुळे देश सर्वात मोठ्या अडचणीचा सामना करत आहे."
काश्मीर जळत असताना मोदी शांत
सीमेवरील घुसखोरी आणि सैनिकांच्या मृत्यूबाबत राहुल गांधी म्हणाले की, "सरकारला आता योग्य योजना आखण्याची आवश्यकता आहे. सीमेपलिकडून होणारा दहशतवाद रोखण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. पण त्यानंतर आतापर्यंत 21 मोठे हल्ले आणि अनेक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा मोदी आम्हाला दोष देत होते. पण आज काश्मीर धगधगत असताना तेच मोदी शांत बसले आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement