Odisha Train Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोर (Balasore) जिल्ह्यात शुक्रवारी तीन ट्रेन एकमेकांवर धडकल्या. बहनागा स्टेशनजवळ एसएमव्हीबी-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. सर्वात आधी हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडल एक्सप्रेसला धडकली. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील कोलकातामधील हावडा स्टेशन आणि तामिळनाडूमधील चेन्नई दरम्यान धावते. त्यादरम्यान येणाऱ्या बालासोर रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाला. 


या अपघातात 15 डब्बे रुळांवरून घसरले आहेत. 7 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. अजूनही अपघातग्रस्त रेल्वे डब्ब्यांमध्ये अनेक लोक अडकल्याचं बोललं जात आहे. देशात कधी आणि किती वेळा मोठे रेल्वे अपघात झाले, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात... 


यापूर्वी, 14 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील डोमोहनीजवळ अपघात झाला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. राजस्थानमधील बिकानेरहून आसाममधील गुवाहाटीकडे जाणाऱ्या बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले होते. त्यानंतर तब्बल काल (शुक्रवार, 3 जून) 34 महिन्यांनी रेल्वे अपघात झाला होता. आता 16 महिन्यांनंतर म्हणजेच, जून 2023 मध्ये आणखी एक रेल्वे अपघात झाला आहे.


कधी अन् कुठे झाला अपघात? 


ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे अपघात झाला. येथे कोरोमंडल एक्स्प्रेस (12841) आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कोरोमंडल एक्स्प्रेसच्या 15 बोगी रुळावरून घसरल्या. एक्सप्रेसचे अनेक डबे मालगाडीवर चढले. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील शालीमारहून चेन्नई सेंट्रलला जात होती. 250 किमी गेल्यानंतर ट्रेनला अपघात झाला.


ट्रेनची एकमेकांना धडक झाल्यानं हा चौथा अपघात 


27 जानेवारी, 1982 : आग्राजवळ दाट धुक्यात मालवाहू ट्रेन आणि एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनची समोरासमोर धडक होऊन 50 जणांचा मृत्यू झाला.
14 मे, 1995: मद्रास-कन्याकुमारी एक्स्प्रेसची सेलमजवळ मालगाडीला धडक बसून 52 जणांचा मृत्यू झाला.
14 डिसेंबर, 2004: जम्मू तावी एक्स्प्रेस आणि जालंधर-अमृतसर पॅसेंजर ट्रेनची समोरासमोर धडक झाली. पंजाबमधील होशियारपूरजवळ हा अपघात झाला. या अपघातात 39 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
2 जून 2023: ओडिशाच्या बालासोरमध्ये कोरोमंडल एक्सप्रेस विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मालगाडीला धडकली. या अपघातात आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 350 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.


आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात, मृतांचा आकडाही सर्वाधिक 


2022 मध्ये 34 महिन्यांनंतर देशात एक रेल्वे अपघात झाला आहे, ज्यामध्ये तब्बल 233 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 22 मार्च 2019 रोजी त्यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. 12 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, 22 मार्च 2019 नंतर असा एकही रेल्वे अपघात झाला नाही ज्यात कोणाचा मृत्यू झाला आहे. अशातच शुक्रवारी झालेला ओडिशा येथील रेल्वे अपघात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक आहे. या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 900 जण जखमी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 


यापूर्वी कधी-कधी झाले रेल्वे अपघात


कडलुंडी नदी पुलाची दुर्घटना (केरळ, 2001)


2001 साली केरळमध्ये कडलुंडी नदीवरील रेल्वे पूल दुर्घटनेत 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा अपघात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचं बोललं जातं. सुमारे 300 लोक जखमी झाले आणि किमान 57 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. केरळमधील कोझिकोडजवळील कडलुंडी नदीवरील 924 क्रमांकाचा पूल ओलांडून ही ट्रेन जात होती. जेव्हा एक डब्बा तुटला आणि ट्रेन रुळावरून घसरली. जोरदार पावसाळ्यामुळे आणि ट्रेनमध्येच काही बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला होता.


रफीगंज रेल्वे ब्रीज (बिहार, 2002)


10 सप्टेंबर 2002 रोजी, उत्तर-मध्य भारतातील धावे नदीवरील पुलावरून हाय-स्पीड राजधानी एक्सप्रेस रुळावरून घसरली. या अपघातात सुमारे 130 जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला जुन्या पुलाला गंज लागल्यानं अपघात झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र नंतर हा अपघात परिसरातील नक्षलवाद्यांनी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचं तपासात निष्पन्न झालं.


वालीगोंडा रेल्वे पूल (तेलंगणा, 2005)


हैद्राबादजवळील वेलीगोंडा येथे असलेला एक छोटा पूल अचानक आलेल्या पुरामुळे वाहून गेला. 29 ऑक्टोबर 2005 रोजी एक ट्रेन पुलाच्या या भागावरून जात होती. पुलाचा काही भाग गायब असल्याची माहिती ट्रेनला नव्हती आणि ही ट्रेन प्रवाशांसह पुलावरुन जाऊ लागली. या अपघातात 114 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते.


भागलपूर (बिहार, 2006)


डिसेंबर 2006 मध्ये हावडा जमालपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसवर 150 वर्ष जुना ओव्हर ब्रिज कोसळला होता. या घटनेत जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला होता.


पुंजागुट्टा ब्रीज (तेलंगाणा, 2007)


हैदराबादमधील पंजागुट्टा येथे एक बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल सप्टेंबर 2007 मध्ये कोसळला. उड्डाणपुलाचा ढिगारा पुलाखालून जाणाऱ्या वाहनांवर पडला, त्यात अनेक जण जखमी झाले. या अपघातात 15 जणांचाही मृत्यू झाला आहे.


कोटा चंबळ ब्रीज (राजस्थान, 2009)


डिसेंबर 2009 मध्ये, राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीवरील एक बांधकामाधीन पूल कोसळला आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुमारे 28 मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या ह्युंदाई आणि गॅमनच्या 14 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.


कोलकाता फ्लायओव्हर (पश्चिम बंगाल, 2016)


31 मार्च 2016 रोजी, कोलकाता येथे निर्माणाधीन विवेकानंद उड्डाणपूल कोसळला ज्यात 27 जणांना प्राण गमवावे लागले आणि सुमारे 80 जण जखमी झाले. आयव्हीआरसीएल या कन्स्ट्रक्शन फर्मविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


मुंबई-गोवा महामार्ग पूल (महाराष्ट्र, 2016)


2 ऑगस्ट 2016 रोजी रात्री उशिरा मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून सुमारे 41 जणांचा मृत्यू झाला होता. सुमारे डझनभर वाहनं नदीत कोसळली, त्यात अनेकजण जखमी झाले होते.


मुंबई फूट ओव्हर ब्रीज (महाराष्ट्र, 2017)


29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज कोसळून 29 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 


माजेरहाट पूल, कोलकाता (पश्चिम बंगाल, 2018)


4 सप्टेंबर 2018 रोजी कोलकाता येथे एक मोठा पूल कोसळला. माजेरहाट ब्रिज हा दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम कोलकाता यांच्यातील मुख्य कनेक्टरपैकी एक होता. संध्याकाळच्या वाहतुकीच्या भाराखाली संपूर्ण पूल कोसळला, 3 जणांचा मृत्यू झाला आणि किमान 20 जण जखमी झाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Odisha Train Accident: कुठे आक्रोश, तर कुणी घेतंय आपल्या माणसांचा शोध... अंगावर शहारे आणणारे ओडिशा अपघाताचे फोटो