PM Modi in France : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे पॅरिसच्या विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आले. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची देखील भेट घेणार आहेत. 






पॅरिसच्या (Paris) ओरली विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे विमान उतरले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या सिनेटमध्ये पोहचणार असून सिनेटचे अध्यक्ष गेराड लार्चर यांची ते भेट घेणार आहेत. तर रात्री 8.45 दरम्यान पंतप्रधान मोदी हे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्यासोबत बैठक करणार आहेत. त्यानंतर ते फ्रान्समधील भारतीय समुदायाला संबोधित देखील करतील. भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देखील भेट घेणार आहे. 


भारत आणि फ्रान्सच्या यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. तसेच त्यांच्या या दौऱ्यामधून अनेक अपेक्षा देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा हा दौरा दोन्ही देशांच्या भविष्यासाठी नव्या दिशा ठरणार असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 


दोन्ही देशांतील धोराणात्मक भागीदारीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, याविषयी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'या वर्षी दोन्ही देशातील धोराणात्मक भागीदारीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. विश्वास आणि संकल्पाने निर्माण झालेल्या या धोराणात्मक भागीदारीने देशांचे संरक्षण, अंतराळ,व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रात महत्त्वाचे सहकार्य केले आहे.'


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील वर्षाच्या फ्रान्सच्या दौऱ्यानंतर 2023 मध्ये  झालेल्या G-7 शिखर परिषदेदरम्यान जपानमधील  हिरोशिमा येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट झाली होती. तसेच या दौऱ्यामध्ये ते फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न, सिनेटचे अध्यक्ष जेरार्ड लार्शल आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष याएल ब्रॉन-पीव्ह यांची भेट घेणार आहेत. 


काय आहे दौऱ्याचं महत्त्व?


पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यातून भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार करण्यात येतील. भारत आणि फ्रान्स इंडो-पॅसिफिक भागामध्ये शांतता आणि सुरक्षा ठेवण्याचं काम करतो. यासंबधित बाबींवर चर्चा होईल. सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक धोरणांसंबधी नवे करार करण्यात येतील. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रापती मॅक्रॉन येत्या काळातील आव्हानांवर चर्चा करतील. यामध्ये हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि विकासाचे लक्ष्य या महत्त्वाच्या मुद्द्यावंर चर्चा होईल. 


हे ही वाचा: 


PM Modi : पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना, नॅशनल डे परेडमध्ये होणार सहभागी; 14 वर्षानंतर भारताला मिळणार 'हा' मान