नवी दिल्ली : राज्यसभेत आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.


दहशतवादी हल्ल्यानंतरचा गुलाम नबी यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदी म्हणाले, दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांनी मला फोन केला आणि ते फोनवर खूप रडले. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आझाद यांच्याशी माझे कायम मैत्रीचे नाते आहे. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका केली. परंतु, त्यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदर आहे.


गुलाम नबी आझाद यांना देशाबरोबरच सदनाची देखील तेवढीच चिंता होती. ही छोटी गोष्ट नाही. कारण विरोधी पक्षात असताना कोणतीही राजकीय व्यक्ती आपले वर्चस्व गाजवण्याचा कायम प्रयत्न करेल. परंतु आझाद तसे नव्हते. शरद पवार यांना देखील आझाद यांच्याप्रमाणे आहे. कोरोना महामारीच्या काळात मला आझाद यांचा फोन आला की, सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक बोलवा. त्यानंतर मी आझाद यांच्या सूचनेनंतर सर्वपक्षीय अध्यक्षांची बैठक बोलवली.


गुलाम नबी आझाद, शमशेर सिंग, मोहम्मद फयाज, नाजिर अहमद या चार सदस्याना निरोप देण्यात आला. हे चारही सदस्य जम्मू काश्मिरचे प्रतिनिधित्व करतात.


संबंधित बातम्या :





कृषी कायद्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी यू-टर्न घेतला, राज्यसभेत पंतप्रधानांचा शरद पवारांवर निशाणा