नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 76 वा दिवस आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात दीप सिद्धू सहभागी होता.
दीप सिद्धू 26 जानेवारीपासून फरार होता
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. मुख्य आरोपी दीप सिद्धू 26 जानेवारीपासून फरार होता. मात्र, दीप सोडून लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारे गँगस्टर लक्खा सिधाना आणि जुगराज अद्याप बेपत्ता आहेत. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सुमारे 50 जणांचे फोटोही जारी केले आहेत.
देशद्रोह आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी धार्मिक झेंडा फडकवणे आणि लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याप्रकरणी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार झाला होता. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथे ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता.
संबंधित बातम्या
- लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश
- Farmer Protest : 'एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस!', आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी राकेश टिकैत यांचा नवा फॉर्म्युला
- लाल किल्ला हिंसाचार: दिल्ली पोलिसांकडून 45 दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध